Crime News : इन्स्टाग्रामवर मैत्री, दुचाकी घेऊन फरार; पोलिसांच्या पडल्या बेड्या

इन्स्टाग्रामवर करण सागवेकर आणि अनिकेत वाडकर यांची मैत्री झाली. या मैत्रीखातर नवी कोरी स्कूटी एक फेरफटका मारण्यासाठी अनिकेत ने करणकडे मागितली होती.
Crime
CrimeSakal
Summary

इन्स्टाग्रामवर करण सागवेकर आणि अनिकेत वाडकर यांची मैत्री झाली. या मैत्रीखातर नवी कोरी स्कूटी एक फेरफटका मारण्यासाठी अनिकेत ने करणकडे मागितली होती.

डोंबिवली - इन्स्टाग्रामवर करण सागवेकर आणि अनिकेत वाडकर यांची मैत्री झाली. या मैत्रीखातर नवी कोरी स्कूटी एक फेरफटका मारण्यासाठी अनिकेत ने करणकडे मागितली होती. फेरी मारण्यासाठी गेलेला अनिकेत दुचाकी घेऊन परतलाच नसल्याने याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. महिनाभर शोध घेतल्यानंतर अखेर इन्स्टाग्रामवरील अनिकेत हा पोलिसांच्या तावडीत सापडला आणि त्याच्या हाती बेड्या पडल्या. इन्स्टाग्रामवर ओळख वाढवायची आणि मित्रांच्या दुचाकी घेऊन फरार व्हायचे हा त्याचा धंदा झाला आहे. अनिकेत चोरी करत असल्याने त्याला घरच्यांनी हाकलून दिले असल्याची बाब तपासात समोर आली आहे.

डोंबिवली पश्चिमेला राहणारा करण सागवेकर (वय 18) याची कल्याण पश्चिमेला राहणाऱ्या अनिकेत वाडकर (वय 19) याच्याशी इन्स्टाग्रामवर मैत्री झाली. अनिकेत ने करणला 1 नोव्हेंबरला ठाकुर्ली रेल्वे स्थानक परिसरात भेटण्यासाठी बोलावले होते. यावेळी करण आपली नवीन स्कूटी घेऊन आला होता. नवीन स्कूटी पाहून गाडी कशी चालते एक रपेट मारण्यासाठी गाडी दे असे अनिकेत ने करणला सांगितले. मित्र असल्याने मैत्रीखातर करणने अनिकेतला गाडीची चावी दिली. गाडी घेऊन अनिकेत रपेट मारायला गेला तो परतलाच नाही.

बराचवेळ वाट पाहिल्यानंतर अनिकेत आपली गाडी घेऊन गेला असल्याचे लक्षात आल्याने करणने याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. दाखल तक्रारीनुसार रामनगर पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही तपासत अनिकेतचा शोध सुरू केला. महिनाभर पोलिस अनिकेतच्या मागावर होते. अखेर कल्याण पश्चिम परिसरात अनिकेत फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार 9 डिसेंबर ला सायंकाळी रामनगर पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक योगेश सानप, पोलिस हवालदार विशाल वाघ, शंकर निवळे, प्रशांत सरनाईक, शिवाजी राठोड, नितीन सांगळे यांच्या पथकाने सापळा रचत अनिकेतला ताब्यात घेतले.

अनिकेतला अटक करत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने ठाण्यातील कोपरी, कोळशेत तसेच डोंबिवलीतील ठाकुर्ली व मानपाडा परिसरात दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून 2 लाख 79 हजार रुपये किंमतीच्या 4 दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. दुचाकी चोरी करत असल्याने अनिकेतच्या वडिलांनी त्याला घरातून हाकलून दिलेले आहे. त्यामुळे तो सध्या फिरस्ता म्हणून इथे तिथे राहत असल्याची बाब पोलिस तपासात उघड झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com