डोंबिवली : स्मार्ट सिटीतील उद्यानेही होणार स्मार्ट रचनेने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

डोंबिवली : स्मार्ट सिटीतील उद्यानेही होणार स्मार्ट रचनेने

डोंबिवली : कल्याण डोंबिवलीचा स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विकास करण्यात येत आहे. शहरातील उद्यानांचा ढोबळ पद्धतीने विकास न करता काहीतरी वेगळे करण्याचा विचार असल्याने कल्याण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट संस्थेने एमएमआर रिजनमध्ये लॅण्डस्केप डिझाईन स्पर्धा भरवित वास्तू विशारदचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून त्यांच्या उद्यानाविषयीच्या कल्पना जाणून घेतल्या आहेत. यास्पर्धेत मृन्मयी बंटे हिने पहिला व तेजस शिरोडे याने दुसरा क्रमांक पटकावला आहे. या संकल्पना च्या आधारे शहरातील उद्यानांचा कायापालट करण्याचा विचार संस्थेचा आहे.

केंद्र शासनाने कल्याण डोंबिवली शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश केला आहे. स्मार्ट सिटीला अनुसरूनच शहरातील उद्यानांचा विकास व्हावा अशी कल्पना संस्थेला सुचली. कांचन गाव येथे एका विकासकाला आरक्षीत भूखंडावर उद्यान विकासीत करण्याचे सरकारने बंधनकारक केले होते. 2500 चौरस मीटर जागेत हे उद्यान विकसीत करायचे असल्याने ते अन्य उद्यानाप्रमाणे विकसीत करण्यापेक्षा त्यासाठी एक वेगळी स्पर्धा घेऊन ते विकसीत करण्याचा विचार कल्याण-इंडीयन इन्स्टीटय़ूट ऑफ आर्किटेक्ट संस्थेने केला. संस्थेच्या कल्याण डोंबिवली सेंटरचा 31 वा वर्धापन दिन देखील असल्याने यानिमित्त लॅण्डस्केप डिझाईनची एक आगळी वेगळी स्पर्धा एमएमआर रिजनमधील आर्किटेक्ट विद्यार्थ्यांकरीता भरविण्यात आली.

हेही वाचा: 95 दिवसांसाठी रोज 3GB डेटा, स्वस्तातला प्लॅन आणि कॉलिंग देखील फ्री

आर्किटेक्टच्या चौथ्या आणि पाचव्या वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये 33 जणांनी सहभाग नोंदविला होता. त्यातील अंतिम फेरीतील 10 जणांमधून दोन क्रमांक काढण्यात आले. लॅण्डस्केपमधील दिग्ग्ज असलेले वास्तू विशारद राजू प्रधान, स्वाती डिके, सुवर्णा साठे यांनी स्पर्धेच्या परिक्षकांचे काम पाहिले. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा डोंबिवलीतील शिवम सभागृहात पार पडला. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष शिरीष नाचणे, केशव चिकोडी, कार्यकारी पदाधिकारी संदीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. संस्थेच्या धनश्री भोसले यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष मेहनत घेतली.

हेही वाचा: कंगनाच्या स्वतंत्र्याबद्दलच्या 'त्या' वक्तव्याचे केले विक्रम गोखलेंनी समर्थन; पाहा व्हिडीओ

कांचन गावमध्ये विकसीत केले जाणारे उद्यान हे मोठे आहे. तशा प्रकारचे उद्यान कल्याण डोंबिवलीत कुठेही नाही. त्यामुळे या उद्दानात झाडे कोणती असतील. कशा प्रकारची असतील. ज्येष्ठ नागरीक आणि मुलांसाठी काय सेक्शन विकसीत केले जातील याचा विचार केला जाणार आहे. केवळ चालण्यासाठी ट्रॅक आणि मुलांसाठी खेळणी अशा ढोबळ पद्धतीने ते विकसीत न करता चांगल्या प्रकारे स्मार्ट सिटीला साजेसे उद्यानच विकसीत केले जाईल याकडे अध्यक्ष नाचणे यांनी लक्ष वेधले.

loading image
go to top