Dombivali News : 6 महिन्याच्या बाळासह 15 वर्षीय मुलगी अडकली लिफ्टमध्ये

अग्निशमन दलाने लिफ्टचा दरवाजा तोडून केली दोन्ही चिमुरड्यांची सुटका.
Lift
LiftSakal

डोंबिवली - कल्याण पश्चिमेतील काही भागातील वीज पुरवठा हा बुधवारी सकाळ पासून खंडीत झाला होता. अचानक वीज पुरवठा खंडीत झाल्याने रौनक सीटी मधील सेक्टर 2 मधील बी 8 या पंधरा मजलीय इमारतीची लिफ्ट बंद पडली.

या लिफ्टमध्ये 16 वर्षीय मुलगी ही 6 महिन्याच्या बाळासह अडकली. लिफ्ट अचानक बंद झाल्याने मुलगी घाबरली. इमारतीच्या सुरक्षा रक्षकाने लिफ्टचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला यश आले नाही. अग्निशमन दलास याची माहिती मिळताच जवानांनी लिफ्टचा दरवाजा कटरच्या सहाय्याने कापून दोन्ही चिमुरड्यांची सुखरुप सुटका केली. सहेदप्रीत कौर (वय 16) व अरनूर कौर (वय 6 महिने) अशी सुटका केलेल्या चिमुरड्यांची नावे आहेत.

कल्याण पश्चिमेतील रौनक सिटी भागातील वीज पुरवठा हा खंडीत झाला होता. सेक्टर 2 मधील बी 8 या पंधरा मजलीय इमारतीची लिफ्ट दुपारी 12.30 च्या दरम्यान वीज पुरवठा खंडीत झाल्याने अचाकन बंद पडली. सोसायटीत राहणारी सहेदप्रीत ही अरनूर याला घेऊन यावेळी लिफ्टमधून जात होती. लिफ्ट बंद पडल्यानंतर सहेदप्रीत हीने आरडा ओरडा सुरु केला. लिफ्टमध्ये कोणी तरी अडकले आहे याची माहिती मिळताच सुरक्षारक्षक तसेच इतर रहिवाशांनी लिफ्टचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला.

मात्र दरवाजा उघडत नसल्याने त्यांचे प्रयत्न असफल ठरले. अखेर 12.49 च्या दरम्यान कल्याण अग्निशमन दलास लिफ्टमध्ये छोटे बाळ व 16 वर्षीय मुलगी अडकल्याची माहिती देण्यात आली.

अग्निशमन दलाचे अधिकारी नामदेव चौधरी यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत काही मिनीटांतच हायड्रोलिक कटरच्या मदतीने लिफ्टचा दरवाजा तोडून या दोन्ही चिमुरड्यांची सुखरूप सुटका केली. चिमुरडे लिफ्टमधून बाहेर येताच स्थानिक नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com