Mohan Bhagwat : शेतकऱ्यांना जगवण हे आपलं कर्तव्य आपण विसरलो का?

आधुनिक जगात मुद्रा महत्त्वाची होते आणि वस्तूचे महत्त्व घटत असं आपल्याला दिसून येतं. त्याच्यामुळे धान्य पिकवणारा शेतकरी तो कर्जबाजारी होतो, तो आत्महत्या करतो.
Mohan Bhagwat
Mohan Bhagwatesakal

डोंबिवली - आधुनिक जगात मुद्रा महत्त्वाची होते आणि वस्तूचे महत्त्व घटत असं आपल्याला दिसून येतं. त्याच्यामुळे धान्य पिकवणारा शेतकरी तो कर्जबाजारी होतो, तो आत्महत्या करतो. तो आपल्याकरता पिकवतो स्वतः करिता नाही पिकवत. आपल्या सगळ्यांना त्याचा लाभ मिळतो. त्याला जगवणे हे आपलं कर्तव्य आहे हे आपण विसरलो का?

असे वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी कल्याण येथे केले. हा पुंजीचा सापळा आहे. श्रम करणारा श्रमिक त्याचं शोषण होतं. वास्तविक एक कुटुंब म्हणून अर्थजगत चाललं पाहिजे त्याच्या करिता संस्कार आणि त्यातून सहकार असे भागवत यांनी सांगितले.

द कल्याण जनता सहकारी बँक आयोजित सुवर्ण मोहोत्सव सांगता समारंभ कार्यक्रमास सरसंघचालक मोहन भागवत यांनी उपस्थिती लावली होती. कल्याण मधील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी बँकेचे अध्यक्ष सी.ए. सचिन आंबेकर, उपाध्यक्ष डॉ. रत्नाकर फाटक, व्यवस्थापकीय संचालक अनंत कुलकर्णी उपस्थित होते.

आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सरसंघचालक मोहन भागवत यांनी सहकार व संघ कसा चालतो त्यासाठी संस्कार कसे आवश्यक आहेत याविषयी सांगितले.

ते म्हणाले, जगातलं दुःख दैन्य दारिद्र्य जगातला शोषण हे संपेपर्यंत आर्थिक जगतातल्या कार्यकर्त्यांना हे कार्य करावे लागत राहणार आहे. संघाच्या स्थापनेच्या 5 वर्षे पूर्वी 1920 ला काँग्रेसचे अधिवेशन झालं महात्मा गांधी अध्यक्ष होते. डॉक्टर हेगडेवारांकडे सगळी अधिवेशनाची व्यवस्था होती. तेथे ते प्रमुख होते आणि विषय नियामक मंडळाचे सदस्य होते. त्याच्यात त्यांनी दोन प्रस्ताव दिले होते.

एक संपूर्ण गोवंश हत्या बंदीचा पुरस्कार काँग्रेस ने करावा तशी मागणी करावी असा होता. आणि दुसरा प्रस्ताव असा होता की भारताच संपूर्ण स्वातंत्र्य हे आपल्या ध्येय आहे असं काँग्रेसने घोषित केलं पाहिजे. आणि हेही घोषित केले पाहिजे की स्वतंत्र भारत सर्व जगाला पुंजीच्या सापळ्यातून मुक्त करेल. पुंजीचा सापळा म्हणजे पैसा. पैसा एक व्यवस्था आहे हे अत्यावश्यक आहे तसे ते कुत्रीम आहे. पैसा खाऊन पोट भरत नाही.

त्याला भातपोळीच खावी लागते. पण ती भात पोळी वाढवणे पिकवणे हा सगळा जो प्रयत्न चालतो त्याच्यामध्ये एक माध्यम म्हणून मुद्रांचा उपयोग आहे. पण मुद्रा महत्त्वाची होते आणि वस्तूचे महत्त्व घटत असं आपल्याला दिसून येतं आधुनिक जगात. तर त्याच्यामुळे असं होतं की पिकवणारा शेतकरी तो कर्जबाजारी होतो तो आत्महत्या करतो हे कसं काय. तो आपल्याकरता पिकवतो स्वतः करिता नाही पिकवत.

आपल्या सगळ्यांना त्याचा लाभ मिळतो. त्याला जगवणे हे आपलं कर्तव्य आहे हे आपण विसरलो का ? हा पुंजीचा सापळा आहे. श्रम करणारा श्रमिक त्याचं शोषण होतं. वास्तविक एक कुटुंब म्हणून अर्थ जगत चाललं पाहिजे त्याच्या करिता संस्कार आणि त्यातून सहकार असे भागवत यांनी सांगितले.

उद्योजकांना कानमंत्र

जनता सहकारी किंवा सहकारी बँक वाटचाल संदर्भात त्यांनी माहिती देतानाच त्यांनी पुष्कळदा नवीन तरुण उद्योजकांना भेटायचा योग येतो. संघाविषयी सांगायचे झाले त्यांना तर ते विचारतात एवढा मोठा संघ चालतोय तर तुम्ही काय सांगाल आम्ही आमचा उद्योग कसा चालवावा. तर मी त्यांना हेच म्हणतो की बाबा उद्योग म्हणजे तुम्हीच फक्त तुमचा परिवार आणि तुमचे कारखाने एवढेच नाही आहे.

त्यात चपरासी पासून मजुरांपर्यंत जे जे तुमच्याशी संबंधित लोक आहेत ते सर्व तुमचे कुटुंबीय आहेत. असे समजून तुम्ही हा उद्योग चालवा. स्वतःच्या नफ्याचा केवळ विचार करू नका. त्यांना काय काय फायदा होतो उद्योगात राहिल्यामुळे तेही पहा. स्वतःच्या मुला बाळांचे भविष्य सुधारित होतं की नाही हे तर तुम्ही पाहताच. पण यांच्या मुलाबाळांचा काय होणार त्याचीही काळजी करा.

असं कराल तर तुमचं उद्योग वाढेल आणि चांगला चालेल. वास्तविक आपली अर्थ जीवनाची ही कल्पना आहे. साधन मर्यादित आहेत आणि माणसाची तृष्णा अमर्याद आहे. हे पाश्चात्य अर्थशास्त्र सांगत. आणि त्यामुळे स्पर्धा आहे स्पर्धा आहे म्हणजे जो बलशाली असेल तो पुढे जाईल. जे मागे राहतील त्यांचं काय त्याला काय इलाज मागे राहील तो मरेल. आपल्याकडे असा विचार नाही.

आपल्याकडे असं म्हटलेलं आहे की सुखाची लालसा अमर्याद आहे साधन मर्यादित आहेत. भौतिक जगात आणि अध्यात्म जगात दोन्हीकडे सुख पाहिजे. त्याच्यामुळे संयम बाळगा कमवा पण दान करा असा सल्ला भागवत यांनी देऊ केला.

मला जिथे संघाने बसवलं तेथून ज्या ठिकाणी फुगा फुगला त्या ठिकाणी छोटीशी पिन लावायची मला सवय.... म्हणून आतापर्यंत जे सत्व बाळगून आपण करत राहिलो असच पुढे करत रहा आता आपला विस्तार आहे या विस्ताराची हा विस्तार शेवटच्या टोकापर्यंत पोहोचला पाहिजे... भागवत याचा सर्व संस्था सह संस्थातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना इशारा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com