
Latest Thane News: कोकणातील प्रथेप्रमाणे डोंबिवली मध्ये घरगुती गणपतीच्या सार्वजनिक म्हणजेच एकत्रिक विसर्जन सोहळ्याचा ट्रेंड लोकप्रिय होताना दिसतो आहे. कलारंग ढोलताशा पथकामार्फत घरगुती गणपतींसाठी मोफत सामूहिक विसर्जन मिरवणुकीचे आयोजन करण्यात येते.
गेले तीन वर्षे पथकाचा हा उपक्रम सुरू असून यंदा चौथ्या वर्षी देखील डोंबिवलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या उपक्रमाला मिळत आहे. यंदा 12 सप्टेंबरला गौरी गणपती विसर्जन दिवशी सामूहिक विसर्जन मिरवणुकीचे अर्थात गणरायाच्या वारीचे आयोजन करण्यात आले आहे.
कलारंगचे नेहाल थोरावडे यांनी सांगितले, या वेळी एका विशेष थीमच्या माध्यमातून महत्वपूर्ण संदेश देण्याचा कलारंग चा प्रयत्न आहे. त्याचबरोबर काही लोकप्रिय गेमिंग इंफ्लूएनसर्स सुद्धा प्रथमच डोंबिवली मध्ये येणार आहेत.