डोंबिवली : लैंगिक विकृतीतून प्रियकर प्रेयसीने केला अल्पवयीन बहीण भावावर अत्याचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

डोंबिवली : लैंगिक विकृतीतून प्रियकर प्रेयसीने केला अल्पवयीन बहीण भावावर अत्याचार

डोंबिवली : लैगिंक विकृतीतून प्रियकर आणि प्रेयसीने दोघा अल्पवयीन भावा बहिणीवर अत्याचार केल्याची घटना कल्याण (Kalyan) पूर्वेत उघडकीस आली आहे. प्रेयसीच्या नात्यातील हे भाऊ बहीण असून नात्याला काळिमा फासणारे कृत्य केल्याने एकच खळबळ उडाली आहे. आरोपी मुलीने पीडित मुलीस प्रियकरासोबत गैरप्रकार करण्यास सांगितल्याने हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

डोंबिवलीत एका अल्पवयीन मुलीवर 34 जणांनी अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच आता कल्याण पूर्वेत अल्पवयीन भाऊ बहिणीवर झालेल्या अत्याचाराने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसी देखील या सर्व घडलेल्या प्रकाराने अवाक झाले आहेत. एक 23 वर्षीय तरुणी नात्यातील 14 वर्षीय मुलावर सातत्याने लैंगिक अत्याचार करत होती.

हेही वाचा: १४ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार, विशेष न्यायाधीशासह तिघांवर गुन्हा दाखल

त्यानंतर तिने आपल्या प्रियकरास सदर मुलाच्या 16 वर्षीय बहिणीवर अत्याचार करण्यास मुलीने विरोध करताच व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी प्रियकर पीडित मुलीस देत होता. एवढेच नाही तर प्रियकराने लॉज वर बोलावले आहे. नाही गेलीस तर घरी येऊन बलात्कार करण्याची धमकी आरोपी मुलीने पीडित मुलीस दिली होती. अखेर पीडित मुलीने नातेवाईकांना घडलेला प्रकार सांगितला. मुलीच्या नातेवाईकांनी कोळसेवाडी पोलीस ठाणे गाठत पीडित मुलगा व मुलीची वेगवेगळी तक्रार नोंदवली आहे.

पोलिसांनी गुन्हा दाखल करीत दोघांना ताब्यात घेतले असून अधिक तपास पोलीस करीत आहेत. या संपूर्ण घटनेचा अल्पवयीन भावा बहिणीवर आघात झाला आहे. तसेच नात्यातील मुलीनेच हे कृत्य केल्याने कुटुंबियांना देखील धक्का बसला आहे.

हेही वाचा: सातारा : कृषी कायदे रद्द केल्याने कऱ्हाडला बळीराजाकडुन साखर वाटप

तरुणांमध्ये वाढणारी लैंगिक विकृती हा चिंतेचा विषय ठरत असून तरुणांना योग्य मार्गदर्शन होणे गरजेचे असल्याचे अशा घटनांतून समोर येत आहे.

loading image
go to top