Dombivali News : मलंगगडाच्या डोंगरावर हुल्लडबाजी

मनाई आदेश झुगारून धबधब्यावर पर्यटकांची गर्दी
Dombivali
Dombivalisakal

डोंबिवली : मलंगगडाच्या डोंगरावर तरुण मद्यपान करत हुल्लडबाजी करताना दिसून येत आहे. अपघातांच्या पार्श्वभूमीवर पर्यटन स्थळी बंदी असतानाही हे आदेश झुगारुन अनेक पर्यटक हे धबधब्यांच्या ठिकाणी गर्दी करत आहेत. मलंगगडावर डोंगराच्या कड्या कपारीत अवघड जागी जाऊन तरुणांचा धिंगाणा सुरु असल्याचे सुट्टीच्या दिवशी चित्र दिसत आहे.

जिल्हा प्रशासनाचे आदेश असतानाही त्याकडे हिल लाईन पोलिसांचे लक्ष नसल्याने या भागात पर्यटक येत आहेत. मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या फर्निक्युलर ट्रॉलीच्या रस्त्यावर ही गर्दी होत असून या रस्त्यावर पोलिसांनी गस्त घालावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

पावसास सुरुवात होताच मलंगगड परिसरात पावसाचा आनंद लुटण्यासाठी नागरिक येथे गर्दी करतात. धबधब्याखाली भिजण्यासाठी परिवारासह नागरिक या ठिकाणी येत असतात. महाविद्यालयीन तरुण तरुणींचा ग्रुप देखील पिकनिकसाठी मोठ्या प्रमाणात या परिसरात येतो. काही हौशी मंडळी नदी पात्रात पाण्याचा अंदाज नसताना उतरतात.

तर धबधब्याखाली भिजण्यासाठी डोंगरावर कडी कपारीत जाऊन बसतात. नदीत बुडून अनेक तरुणांनी मागील वर्षी आपला जीव या भागात गमावला आहे. पावसाळ्यात घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर जमाव बंदीचे आदेश लागू केले आहेत. 30 ऑगस्ट पर्यंत ही बंदी लागू करण्यात आली आहे.

Dombivali
Dombivali News : मानपाडा-बाजारपेठ पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरिक्षकांची खुर्ची गेले दोन महिने रिकामीच

बंदी असतानाही अनेक पर्यटक हे मलंगगड परिसरात पावसाचा आनंद घेण्यासाठी जात असल्याचे दिसत आहे. जीवाची पर्वा न करता काही मंडळी ही मद्यपान करत हुल्लडबाज पणा करताना देखील दिसतात. फर्निक्लुलर ट्रॉलीचा रस्ता हा सिमेंट कॉंक्रीटीकरणचा करण्यात आला असून हा परिसर नयनरम्य झाल्याने या भागात अनेक पर्यटक गर्दी करतात.

काही दुचाकीस्वार येथे रेसिंग देखील करतात. बुलेटस्वार गाडीच्या सायलेंसरचा मोठा आवाज करत त्या रस्त्यावरुन गाड्या नेत आहेत. यामुळे परिसरातील शांतता देखील नष्ट होत आहे. जिल्हा प्रशासनाने बंदीचे आदेश दिले असताना ही हिल लाईन पोलिसांचे याकडे लक्ष नसल्याने पर्यटक या भागात जात आहेत.

Dombivali
Dombivali News : खड्ड्यांवर आता कविता देखील आली...

मागीलवर्षी काही पर्यटकांना आपला जीव गमवावा लागल्यानंतर पोलिसांनी या परिसरात नाकाबंदी केली होती. यावर्षी देखील एखादा अपघात होण्याची पोलिस प्रशासन वाट पहात आहे का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com