Dombivali News : भोपरमध्ये उघड्या केबलचा शॉक लागल्याने ५ म्हशींचा मृत्यू

डोंबिवली पूर्वेतील भोपर गावात राहणारे गणेश पाटील यांच्या मालकीच्या या म्हशी आहेत.
animal death
animal death sakal

डोंबिवली- डोंबिवली पूर्वेतील भोपर गावात रविवारी सकाळी 5 म्हशींचा दुर्देवी मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. महावितरणच्या विजेच्या खांबा जवळील उघड्या केबल वायर चा शॉक लागल्याने या म्हशींचा मृत्यु झाला आहे.

डोंबिवली पूर्वेतील भोपर गावात राहणारे गणेश पाटील यांच्या मालकीच्या या म्हशी आहेत. दूध विक्री चा त्यांचा व्यवसाय असून या म्हशींवर त्यांचा उदरनिर्वाह होता. रविवारी सकाळी म्हशींना चरण्यासाठी घरातील गुराखी निघाला होता. वाटेत विजेच्या खांबाजवळ केबलची उघडी वायर पडली होती.

animal death
Modi In Navi Mumbai: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नवी मुंबई दौरा ठरला; असं असणार वेळापत्रक!

या वायरीला म्हशी चिकटल्या आणि शॉक लागून त्या जागीच गतप्राण झाला. त्यांना चरण्यासाठी नेणारा गुराखी हा थोडक्यात वाचला आहे. गावात सकाळीच अशी घटना घडल्याने एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच महावितरणचे काही कर्मचारी घटनास्थळी पाहणी करण्यासाठी आले. या घटनेची मानपाडा पोलीस ठाण्यात देखील नोंद करण्यात आली आहे. महावितरणने उघड्या केबल वायर चा त्वरीत बंदोबस्त केला पाहीजे. तसेच गणेश पाटील यांना भरपाई देखील मिळाली पाहीजे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com