आईला शिवीगाळ केल्याने महिलेची निर्घृण हत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

डोंबिवली - आईला शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून डोंबिवलीत एका तरुणाने खासगी शिकवणी घेणाऱ्या महिलेच्या डोक्‍यात कुकर घालून निर्घृण हत्या केली. हा प्रकार रविवारी (ता. 4) सायंकाळी घडला. पोलिसांनी आरोपी रोहित तायडेला अटक केली आहे.

मनीषा खानोलकर, असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. डोंबिवलीतील कोपर परिसरात त्या राहत होत्या. रविवारी सायंकाळी मुले
शिकवणीसाठी आली असता त्यांनी दरवाजा उघडला नाही. खिडकीतून डोकावून पाहिले असता खानोलकर रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. हा प्रकार सोसायटीत सांगताच पोलिसांना माहिती दिली. मनीषा यांनी त्याच्या आईला शिवीगाळ केली होती, या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्याने हत्या केल्याची कबुली तायडेने दिली आहे.

Web Title: dombivali news mumbai news women murder