Dombivali News : घनकचरा विभागातील 4 अधिकाऱ्यांचे वेतनवाढ रोखली; शहर स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणे अधिकाऱ्यांना भोवले

कल्याण डोंबिवली शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असताना दुसरीकडे शहरात अनेक ठिकाणी कचरा पडलेला,
kalyan dombivali
kalyan dombivalisakal

डोंबिवली - कल्याण डोंबिवली शहरात अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरल्याचे दिसून येते. नागरिक याविषयी तक्रार करतात पण अधिकारी त्याकडे साफ दुर्लक्ष करतात. शहरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणे 4 स्वच्छता अधिकाऱ्यांना मात्र चांगलेच भोवले आहे.

घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी कामात हलगर्जीपणा करणाऱ्या मोहनिष गडे, शरद पांढ रे, अर्जुन वाघमारे, प्रशांत गायकवाड या अधिकाऱ्यांची वार्षिक वेतनवाढ रोखण्याची कारवाई केली आहे. ही कारवाई इतर अधिकाऱ्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारी असून आता तरी अधिकारी आपल्या कामावर लक्ष देतात का हे पहावे लागेल.

कल्याण डोंबिवली शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असताना दुसरीकडे शहरात अनेक ठिकाणी कचरा पडलेला, घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसते. नागरिक तक्रार करतात पण अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करतात.

घनकचरा विभागाचे तत्कालीन उपायुक्त रामदास कोकरे यांच्या कार्यकाळात शहर स्वच्छतेसाठी अनेक उपाययोजना केल्या. त्यांच्या बदलीनंतर याकडे काही प्रमाणात दुर्लक्ष झाले. सध्याचे उपायुक्त पाटील यांनी देखील अनेक यंत्रणा राबवित शहर स्वच्छतेच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. मात्र पालिका अधिकारीच या कामात दिरंगाई करत असल्याचे पाटील यांच्या कानावर येत होती.

स्वच्छ भारत अभियानात केंद्र सरकारच्या यादीत प्रथम क्रमांकाने येण्यासाठी पालिकेचे प्रयत्न आहेत. असे असताना कल्याणमधील एक स्वच्छता निरीक्षक, एक स्वच्छता अधिकारी आणि याच संवर्गातील डोंबिवलीतील दोन अधिकारी कामात चालढकलपणा करत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अखेर पाटील यांनी आक्रमक कारवाईचा बडगा उगारला असून मागील तीन वर्षात प्रथमच अशी कारवाई स्वच्छता अधिकाऱ्यांवर करण्यात आल्याने घनकचरा विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

kalyan dombivali
Mumbai : केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या भेटीसाठी जे जे मध्ये चित्रकला प्रदर्शन

प्रभागातील सार्वजनिक स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणे, सफाई कामगारांवर योग्य ते नियंत्रण न ठेवणे आणि कचऱ्याविषयीच्या तक्रारींचा निपटारा न करणे, असा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.

प्रत्येक स्वच्छता निरीक्षक, अधिकाऱ्याने आपल्या प्रभागातील कोठेही सार्वजनिक ठिकाणी कचरा पडणार नाही याची दक्षता घेण्याचे उपायुक्त पाटील यांचे आदेश आहेत. हा कचरा उचलण्यासाठी प्रत्येक प्रभाग, घर, गल्ली, झोपडपट्टी भागात घंटागाडीचे नियोजन केले आहे. रात्रीचा कचरा उचलण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.

kalyan dombivali
Mumbai Crime : मुंबईतील ‘सिरियल रेपिस्ट’ डॉक्टराविरुद्ध पाचवा गुन्हा दाखल

अशा परिस्थितीत कल्याण, डोंबिवलीतील एकूण चार स्वच्छता अधिकारी कामात चालढकलपणा करत आपल्या प्रभागातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष करत आल्याचे घनकचरा विभागाच्या निदर्शनास आले होते. त्यांना वारंवार कार्यक्षमता दाखविण्याच्या आणि कामात सुधारणा करण्याचे सूचित करण्यात आले होते.

वारंवार सूचना करूनही या चारही अधिकाऱ्यांच्या कामात कोणतीही प्रगती होत नसल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली असून त्यांची वार्षिक वेतनवाढ रोखण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती उपायुक्त पाटील यांनी दिली.

कल्याण-डोंबिवली शहरे कचरामुक्त करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहे्त. हे माहिती असुनही घनकचरा विभागातील काही अधिकारी कामात निष्काळजीपणा करत होते. पूर्वसूचना देऊनही त्यांच्या कामात सुधारणा न झाल्याने त्यांची वार्षिक वेतनवाढ रोखण्यात आली आहे.

यापुढे ही कामात चालढकल करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल तर जे चांगले काम करत आहेत त्यांच्या कामाची दखल घेत बक्षिस दिले जाईल. प्रत्येकाने आपले कर्तव्य योग्य पध्दतीने पार पाडावे याचसाठी ही कारवाई आहे.

अतुल पाटील, उपायुक्त, घनकचरा विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com