Dombivali News : डोंबिवलीत पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा; इंधन टँकर चालकांच्या संपाचा धसका

इंधन टँकर चालकांनी पुकारलेल्या संपामुळे अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर इंधनाचा तुटवडा जाणवू लागला आहे.
Petrol Pump Line
Petrol Pump LineSakal

डोंबिवली - इंधन टँकर चालकांनी पुकारलेल्या संपामुळे अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर इंधनाचा तुटवडा जाणवू लागला आहे. कल्याण डोंबिवलीतील बहुतांश पेट्रोल पंप दुपारी बंद करण्यात आले. यामुळे एखाद दुसऱ्या चालू पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी वाहनांनी रांगाच रांगा लावल्या होत्या.

कल्याण शीळ रोडवरील एका पेट्रोल पंपावर अशीच गर्दी दिसून आली. वाहनांची ही रांग पूर्ण रस्त्यापर्यंत गेली होती विशेष म्हणजे या पेट्रोल पंपावरील इंधन हे 10 ते 12 रुपयांनी महाग असून सुद्धा ते भरण्यासाठी वाहन चालकांनी येथे गर्दी केली होती.

इंधन टँकर चालकांसंदर्भात केंद्राने घातलेल्या जाचक अटींच्या निषेधार्थ टँकर चालकांनी संप पुकारला आहे. या संपामुळे अनेक ठिकाणी इंधनचा तुटवडा मंगळवारी जाणवू लागला. कल्याण डोंबिवली मधील बहुतांश पेट्रोल पंप हे दुपार नंतर बंद करण्यात आले. हे पेट्रोल पंप बंद होताच वाहन चालकांनी कल्याण शीळ रोडवरील एका पेट्रोल पंपावर गर्दी केली. विशेष म्हणजे याठिकाणी इंधन महाग असून सुद्धा वाहन चालकांनी येथे गर्दी केली होती.

वाहनांच्या रांगा पार रस्त्यापर्यत गेल्या होत्या. पेट्रोल पंप बंद झाल्याने इथे आलो आहोत. महाग असले तरी आता पर्याय नाही. हा संप कधी मिटेल व त्यानंतर ते इथे येईल मात्र त्यानंतर देखील इंधन भरण्यासाठी वाहन चालक गर्दी करतील म्हणून आज येथे पेट्रोल भरत असल्याचे यावेळी वाहन चालकानी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com