esakal | डोंबिवलीच्या 'त्या' खड्डयातून कुंडीची चोरी होताच पुन्हा अपघात
sakal

बोलून बातमी शोधा

डोंबिवलीच्या 'त्या' खड्डयातून कुंडीची चोरी होताच पुन्हा अपघात

डोंबिवलीच्या 'त्या' खड्डयातून कुंडीची चोरी होताच पुन्हा अपघात

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

डोंबिवली- गेले काही दिवस पावसाची संततधार सुरु आहे. पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे खड्ड्यांचा (pothole) अंदाज येत नसून अनेक वाहनांचे अपघात घडत आहेत. डोंबिवलीतील (dombivali) न्यू कल्याण रोडवर असाच एक जीवघेणा खड्डा असून त्या ठिकाणी अपघात होऊ नये म्हणून महेश चव्हाण (Mahesh chavan) या नागरिकाने त्यात कुंडी ठेवली होती. ही कुंडी एक रिक्षाचालक (auto) घेऊन पसार झाला. याविषयी ई सकाळ ने वृत्त प्रसारित केले होते.

कुंडी गायब होताच काही तासाच्या आत या खड्ड्यात एका दुचाकीस्वाराचा अपघात होऊन तो जखमी झाला आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. प्रशासन यावर काही उपाय योजना करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. डोंबिवलीतील न्यू कल्याण रोड द फूड व्हिलेज हॉटेल समोरील रस्त्यावर एक मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्याचा अंदाज वाहनचालकांना येत नसल्याने त्यात वाहने आदळून अपघात घडत आहे. ही बाब लक्षात येताच महेश चव्हाण यांनी नागरिकांना येथे खड्डा आहे हे दिसावे, यासाठी खड्ड्यात खडी टाकली मात्र पावसामुळे ती वाहून गेली.

हेही वाचा: 'गर्लफ्रेंडसोबत अफेअर तोडतो', पत्नीने मुलाच्या हत्येत नवऱ्याला दिली साथ

नंतर त्यांनी तयार ट्यूब ठेवली ती चोरीला गेली, अखेर त्यांनी खड्ड्यात रोपट्याची कुंडी ठेवली. मात्र एक रिक्षाचालक ती ही घेऊन पसार झाला. अपघात टाळावा म्हणून ठेवलेली कुंडीही काही नागरिक चोरून नेत असल्याने नागरिकांच्या या कृत्याला काय म्हणावे याविषयी ई सकाळने वृत्त प्रसारित केले होते.

हेही वाचा: अलीगढशी जुनं नातं; मोदींनी सांगितली वडिलांच्या मुस्लिम मित्राची आठवण

ही कुंडी चोरीला जाताच काही तास उलटत नाही तोच या खड्ड्यात दुचाकी आदळून एक अपघात घडला. यामध्ये दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला आहे. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या खड्ड्यात अपघात घडत असून चालक जखमी होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अपघात होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी किमान पालिकेने वाहने सावकाश चालवा, खड्डे आहेत अशा काही सूचना असलेले फलक लावावेत अशी मागणी जागरूक नागरिक करीत आहेत. या खड्ड्यात अपघात झाल्याचे समजताच, व पावसानेही आज काहीशी उसंत घेतल्याने, पालिका प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात हा खड्डा बुजविला आहे.

loading image
go to top