केरळमधील पूरग्रस्त प्राण्यांच्या मदतीला डोंबिवली मधील प्राणीमित्र

संजीत वायंगणकर
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

डोंबिवली - केरळ मधील पुराचे पाणी आता ओसरू लागले आणि मदत कार्याला वेग आला आहे. विविध सरकारी यंत्रणा, आर्मी, सामाजिक संस्था आणि पुरग्रस्त नागरिकांना मदत करण्यासाठी गेलेल्या आहेत. जसा केरळमधील पुरचा फटका पशुपक्ष्यांना देखील बसला आहे. केरळ धील काही संस्था प्राण्यांसाठी मदतकार्य करत आहेत मात्र त्यांना सहकार्य करण्यासाठी डोंबिवली मधील 'पॉज' म्हणजे 'पेटस् अॅड अॅनिमल वेल्फेअर असोशिएशन' या संस्थेने पुढाकार घेतला आहे.

केरळमध्ये ह्यूमेन सोसायटी इंटरनॅशनल आणि क्यूपा या संस्थांनी आजारी प्राण्यांसाठी कॅम्प लावले आहेत. त्यांनी पॉज संस्थेला मदत करण्यासाठी आवाहन केले, त्यानुसार सोमवार पासून पॉज संस्थेने कल्याण डोंबिवली आणि परिसरातील प्राणी मित्रांकडून मदत गोळा करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत 150 किलो डॉग फूड, 40 किलो कॅट फूड, बॉल्स, घोड्यांचे खाद्य, ताडपत्र्या, डेटॉल, हळद, बेटाडिन, कॉटन व इतर लागणारी औषधे, सलाईन जमा करून पाठवायला सुरुवात केली आहे.

डोंबिवलीमधील संस्थेने आतापर्यंत गेल्या 18 वर्षात आलेल्या नैसर्गिक आपत्तीत भटक्या पशु-पक्ष्यांना आणि वन्य जीवांना मदत केली आहे. 2004च्या सुनामीमध्ये पॉज संस्थेने प्रथम औषधें पाठवली होती ते अगदी 2014च्या नेपाळ भूकंपमध्ये स्वतः जाऊन मदत केली होती. मानव निर्मित आपत्ती - डोंबिवली इंडस्ट्रीयल ब्लास्टमध्ये देखील पॉज संस्थेने मदत करून, कुत्रे आणि पक्षी वाचवले होते. असे संस्थेच्या सेक्रेटरी अनुराधा रामस्वामी यांनी सांगितले. आता जी मदत केरळमध्ये केली जात आहे ती पॉज संस्थेच्या 18 वर्षात उभ्या केलेल्या नेटवर्क मुळे असे संस्थापक निलेश भणगे यांनी सांगितले.

Web Title: dombivali pranimitra sends help to flood-affected animals in Kerala