डोंबिवली : बाळाची परस्पर खरेदी विक्री प्रकरणी डॉक्टर सह आई वडिलांवर गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

डोंबिवली : बाळाची परस्पर खरेदी विक्री प्रकरणी डॉक्टर सह आई वडिलांवर गुन्हा दाखल

डोंबिवली : दत्तक प्रक्रिया पूर्ण न करता नवजात बालकाची परस्पर खरेदी विक्री केल्याची घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी बाळाची आई प्रिया आहिरे, वडील संतोष आहिरे यांच्यासह डॉक्टर केतन सोनी यांच्यावर रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉक्टर सोनी यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. यापूर्वी नवजात बाळाची 2 लाखाचा विक्री झाल्याची घटना समोर आली होती. तोच महिन्याभरात दुसरी घटना उघडकीस आल्याने कल्याण डोंबिवलीत नवजात शिशुची परस्पर खरेदी विक्रीचे व्यवहार होत असून याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

डोंबिवली पूर्वेतील इंदिरानगर झोपडपट्टीत आहिरे कुटुंब राहण्यास आहे. आहिरे यांना पहिले एक मुलगा व मुलगी आहे. त्या तिसऱ्यांदा गरोदर राहिल्या होत्या. घरची हालाकीची परिस्थिती व प्रिया यांची तब्येत ही ठीक नसल्याने तिसरे बाळ नको म्हणून आहिरे दांपत्य कल्याणच्या सोनी डॉक्टरकडे गेले. मात्र प्रिया यांना पाच महिने उलटल्याने डॉक्टरांनी बाळाला वाढवा मी सांभाळ करेल असा सल्ला दिला. डॉ. सोनी हे कल्याण शहरात नंदादीप अनाथ मुलांचे वसतिगृह चालवितात. सोनी यांनी आहिरे यांचा बाळंतपणाचा सर्व खर्च केला. 10 नोव्हेंबरला प्रिया यांनी मुलाला जन्म दिला. ठरल्याप्रमाणे आहिरे दाम्पत्याने सोनी यांना 15 नोव्हेंबरला गणपती मंदिराजवळ बाळ सुपूर्द केले.

हेही वाचा: डोंबिवली : लैंगिक विकृतीतून प्रियकर प्रेयसीने केला अल्पवयीन बहीण भावावर अत्याचार

मात्र 4 ते 5 दिवसांनी प्रिया यांना बाळाची पुन्हा आठवण येऊ लागल्याने त्यांनी डॉ. सोनी यांच्याकडे आपलं बाळ पुन्हा देण्याची मागणी केली. सोनी यांनी बाळ परत देतो माझा खर्च द्या असे सांगितले. मात्र आहिरे दाम्पत्य पैसे देऊ न शकल्याने त्यांनी ठाणे येथील सलाम बालक ट्रस्ट, चाईल्ड लाईन यांच्याशी संपर्क साधला. त्यानुसार संस्थेच्या समनव्यक श्रद्धा नारकर यांनी बुधवारी रामनगर पोलीस ठाण्यात डॉक्टरसह आई, वडीलांवर गुन्हा दाखल केला.

रामनगर पोलिसांनी बाळास ताब्यात घेत जननी आशिष बाल संगोपन केंद्रात त्याला ठेवले आहे. आरोपींना सध्या समजपत्र देऊन सोडण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत दोषारोप पत्रासह कल्याण न्यायालयात त्यांना हजर केले जाईल अशी माहिती तपास अधिकारी पोलीस उप निरीक्षक संदीप शिंगटे यांनी सांगितले.

loading image
go to top