Vivek Khamkar : आदित्य यांनी जर मनात आणलं तर यांचं डिपॉझिट जप्त होईल

ठाकरे गटाच्या डोंबिवली शहर प्रमुख विवेक खामकरांचा महायुतीवर हल्लाबोल
Vivek Khamkar
Vivek Khamkarsakal

डोंबिवली - येत्या दोन तीन दिवसांत आमचा उमेदवार जाहीर होईल. उमेदवार कोणी ही देऊ दे, मूह तोड जवाब देणार. धाकदपटशाही करून आमच्या तीन उमेदवारांचे खच्चीकरण केलं यांनी उदा. सुभाष भोईर यांचे आहे. तसेच हे जे सतत बाळराजे बोलतात. बाळराजे आदित्यजींनी जर मनात आणले तर यांचे डिपॉझिट जप्त होईल. त्यामुळे यांनी अशा वल्गना सतत करु नये. असे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे डोंबिवली शहर प्रमुख विवेक खामकर यांनी ठणकावून सांगत महायुतीवर हल्लाबोल केला आहे.

महायुतीचे उमेदवार म्हणून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे नाव जवळपास निश्चित आहे. महायुतीच्या नेत्यांनी त्यांचा तसा प्रचारच सुरू केल्याने शिंदे यांच्याच नावाची चर्चा आहे. भाजपचे मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सुरवातीला शिवसेनेला कडाडून विरोध केला होता. मात्र सध्या ते शिंदे यांचा प्रचार करत असल्याने ठाकरे गटाने त्यांचा समाचार घेतला आहे.

रवींद्र चव्हाण ज्या पद्धतीने चाललेत. मग दोन वर्षांपूर्वीच हे पत्र काय होतं. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे मारेकरी एकनाथ शिंदे या पद्धतीचा फतवा त्यांनी जो काढला होता. म्हणजे खरंच या दोन-तीन वर्षात एवढं परिवर्तन झालं का? जर तुम्ही प्रशासकीय कार्यक्रम गरीब गरजू लोकांसाठी तर, त्या गरजांचे विषय तुम्ही त्या लोकांपुरते मर्यादित ठेवा. त्याच्यामध्ये घाणेरड राजकारण हे करू नका. भिक्षुकेच राजकारण आहे हे, मतांचा जोगवा ते मागत आहे असे खामकर म्हणाले.

महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवार येथे जाहीर झाला नाही असे विरोधकांकडून बोलले जात आहे. यावर खामकर म्हणाले, दोन तीन दिवसांत ठाकरे गटाचा उमेदवार जाहीर होईल. वर परिस्थिती अशी आहे की आम्हाला उमेदवार कोणीही दवो, मुह तोड जवाब देणार.उमेदवार निवडून आणणार म्हणजे आणणार. आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे वर्जिन शिवसेना यांचाच असेल.

कोणी किती ओरडू दे, बोंबलू दे, वाटप करू दे किंवा वरतून पैसा टाकू दे काही फरक पडणार नाही. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की गेल्या वेळच्या खासदारकीचा आर्थिक ओघ काय होता. आज परिस्थिती वेगळी आहे. प्रवाहामध्ये विखुरलेला जो शिवसैनिक होता त्यांना सोबत घेतले आहे. ब्रँड उद्धव ठाकरेच असतील आणि हा चालणार महाराष्ट्रात. कोणी किती जिवाच रान करा, चोरी मारी करायच ते करा.

दादागिरी, गुंडागिरी करायचे ते करा. तुमची धाकदपटशाही एवढं जर होतं ना तर मी उदाहरण सुभाष भोईरांच देतो. उमेदवार आमचा ऍडव्हान्स मध्ये तयार होता. का त्यांच खच्चीकरण केलं. असे किती भामटे आहेत जर आज आम्ही नंगे झालो तर हे जे गेलेत आमच्यातून ते का गेलेत याची लिस्ट लावू.

बांधकामांपासून सगळ्या गोष्टी उघड करू. ही गोष्ट लक्षात ठेवा डीवचू नका. जो उमेदवार देतील तो आमच्यासाठी शिरसावंद. सगळ्या लोकसभेचा शिवसैनिक तुटून पडेल आणि निवडून आणेल. कारण संपूर्ण लोकमत हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. आतापर्यंत तीन उमेदवार समोर आले त्यांच खच्चीकरण केलं गेलं हे उघड आहे.

त्यामुळे हे आदित्य बद्दल जे बोलतात ना ते बाळराजे आहेत. जर आदित्यजींनी मनात आणलं इथे लढवायचं तर यांची डिपॉझिट पण जप्त होईल. त्यामुळे यांनी सारख्या त्या वलग्ना करू नये यापेक्षा मी अजून काही बोलत नाही असे खामकर म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com