

Dombivli Crime
ESakal
डोंबिवली : गोलवली येथील एका लॉजमध्ये २३ वर्षीय फिजिओथेरपीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. विद्यार्थिनीच्या वडिलांनी सुमीत खवळे (वय ३०) याच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, मानसिक त्रास, खासगी फोटो समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी दिल्याने आत्महत्या केल्याचा आरोप केला आहे.