डोंबिवली - स्वा. सावरकर मुद्द्यांवर सेनेचा भाजपला शह देण्याचा प्रयत्न

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्घाटन आणि भूमिपूजनाचा धडाका...
Kalyan Dombivli for Municipal Election
Kalyan Dombivli for Municipal Electionsakal

डोंबिवली : स्वा. सावरकरांचा मुद्दा उपस्थित करत भाजपने महाविकास आघाडीतील शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीतही स्वा. सावरकर रोड प्रभागच गायब केल्याच्या मुद्द्यावर भाजपने सेनेला लक्ष केले आहे. मात्र सेनेनेही भाजपला शह देण्याची योजना आखली असून याच पार्श्वभूमीवर आज कल्याण येथे स्वा. सावरकर सभागृहाचे लोकार्पण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते केले जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूकीचे बिगुल लवकरच वाजणार असून त्याअनुषंगाने सर्वच पक्षाने आपल्या हालचाली सुरू केल्या आहेत. येथे प्रथमच पॅनल पध्दतीने निवडणूक होत असून मॅजिक फिगर गाठण्यासाठी सेनेची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. भाजपसोबत असलेला घरोबा तोडून शिवसेनेने राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्तास्थापन केली. त्यानंतर शक्य तिथे सेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजपनं आटापिटा सुरू केल्याचे दिसत आहे.

राज्यातील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील हा मुद्दा स्थानिक पातळीवर उपस्थित केला जात आहे. कल्याण डोंबिवली महापालिका सार्वत्रिक निवडणूकिसाठी प्रारूप प्रभाग रचना आराखडा तयार करण्यात आला असून यामध्ये स्वा. सावरकर रोड हा प्रभागच गायब केला गेला आहे. हा मुद्दा पकडत

सत्ताधारी सेनेने डोंबिवली तून सावरकर यांचे विचार संपवण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचा आरोप भाजपने करत आंदोलन देखील केले. कल्याण डोंबिवलीतील प्रस्तावित विकास कामांचे भूमिपूजन आणि उदघाटन सोहळ्याचे जंगी आयोजन शिवसेनेकडून करण्यात आले आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते हे केले जाणार आहे.

यामध्ये मागील काही वर्षांपासून पालिका मुख्यालयातील स्वा. वि. दा. सावरकर सभागृहाचे काम सुरू होते. ते काम पूर्ण झाले असून या सभागृहाचे लोकार्पण पर्यावरण मंत्री यांच्या हस्ते केले जाणार आहे. तसेच कल्याण दुर्गाडी किल्ला व खाडी किनारा याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांनी मराठा आरमाराची मुहूर्तमेढ रोवली.

दुर्गाडी किल्ला व खाडी किनाराचे ऐतिहासिक महत्व जपण्यासाठी येथे स्मार्ट सिटी योजनेतून नौदल संग्रहालय आणि खाडी किनारा सुशोभिकरण केले जाणार आहे. या कामाचे भूमिपूजन मंत्री ठाकरे यांच्याहस्ते होणार आहे. यासोबतच रस्त्यांची कामे व इतर विकास कामाचेही उद्घाटन केले जाणार आहे.

स्वा. सावरकर सभागृहाचे लोकार्पण आणि नौदल आरमार भूमिपूजन ही कामे म्हणजे भाजपला शह देण्यासाठी सेनेने केलेला प्रयत्न आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वा. सावरकर यांच्या मुद्द्यांवर कल्याण डोंबिवलीतील राजकारण येत्या निवडणूकीत रंगण्याची देखील शक्यता आहे.

डोंबिवली मधील आजी - माजी नगरसेवक आज शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता डोंबिवली मधील राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये गेलेले आजी माजी नगरसेवक शिवसेनेत जाण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. पर्यावरण मंत्री ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश होण्याची शक्यता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com