
डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील खंबाळपाडा येथे राहणारा एका 17 वर्षीय मुलीचा सातत्याने पाठलाग करून रिलेशन शिप मध्ये राहण्यास 19 वर्षीय तरुण जबरदस्ती करत होता. रिलेशन शिप ठेवले नाही तर हाताची नस कापून घेण्याची धमकी तरुण मुलीला देत होता. अखेर मुलीने टिळकनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी मंगळवारी रात्री तक्रार दाखल केली. दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी स्वामी रमेश राठोड यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.