

Dumper Driver Crushes Contractor Car
ESakal
डोंबिवली : मालकाने पगार थकवल्यामुळे किंवा वेतनात घट केल्यामुळे कर्मचाऱ्यांकडून संताप व्यक्त केला जातो. मात्र एका कर्मचाऱ्याचा असाच संताप रौद्र रूपात बदलल्याचे समोर आले आहे. पगार थकवल्याने डम्पर चालकाने थेट मालकाची चारचाकी गाडी डम्परच्या मदतीने फरफटत नेली आहे. या प्रकाराचा व्हिडिओ समोर आला असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.