

Dombivli Illegal Washing Center
ESakal
डोंबिवली : शहराच्या बाहेर बेकायदा वॉशिंग सेंटरचा सुळसुळाट सुरु असताना आता डोंबिवली शहरात देखील त्यांचा शिरकाव झाला आहे. ९० फीट रोडवर नव्याने वॉशिंग सेंटर सुरु झाले असून विशेष म्हणजे पालिकेच्या शौचालयाच्या पाईपलाईनवरुन पाणी घेतले आहे. एकीकडे शहरात काही भागात पाणी टंचाईच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत असताना दुसरीकडे सर्रास पाण्याची उधळपट्टी सेंटर मार्फत सुरु असल्याचे दिसून येते.