डोंबिवलीत लोकलचा डबा रुळावरून घसरला, ऐन गर्दीच्यावेळी वाहतूक विस्कळीत; तर पनवेलमध्ये रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली, चौघे अडकले

मध्य रेल्वेवर डोंबिवलीत लोकलचा डबा रुळावरून घसरल्याची घटना घडलीय. सुदैवाने लोकल रिकामी असल्यानं कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पण लोकलसेवा विस्कळीत झाली आहे.
Dombivli Local Train Derails

Dombivli Local Train Derails

Esakal

Updated on

डोंबिवली स्थानकात कळवा कारशेडकडून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकलचा डबा घसरल्याची घटना घडलीय. ऐन गर्दीच्या वेळी घडलेल्या या घटनेमुळे लोकलसेवा विस्कळीत झालीय. सुदैवाने लोकल रिकामी असल्यानं कोणताही अनर्थ घडला नाही. मात्र, लोकलचा डबा घसरल्याच्या घटनेमुळे लोकल वाहतुकीवर परिणाम झाला आहे. डोंबिवली, कल्याण रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com