

ठाणे: जग २१व्या शतकाकडे वाटचाल करत असताना एमआयडीसी मात्र ऑनलाईन पेमेंट सुविधा राबवण्यास असमर्थ ठरल्याने संताप व्यक्त होत आहे. डोंबिवली एमआयडीसी क्षेत्रातील लिजवर राहणाऱ्या शेकडो कुटुंबांना ठाण्यातील कार्यालयात एक रुपया वार्षिक भाडे भरण्यासाठी २० किलोमीटर नाहक प्रवास करावा लागत असल्याची तक्रार जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात मांडल्यानंतर आमदार संजय केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. त्यामुळे आता आठवड्याभरात या सुविधेबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.