
डोंबिवली : कल्याण शिळरोडवरील देसाई खाडी ते काटई नाका उड्डाणपूलाचे शुक्रवारी शिवसेना शिंदे गटाने घाईघाईने उद्घाटन करून पूल वाहतुकीसाठी खुला केला. या पुलाचे काम शिल्लक असल्याने त्वरित पूल बंद करण्यात आला असला तरी येथील अडथळा काढल्यामुळे काही वाहन चालक पुलावरून वाहने हरकत आहेत. पुलावर गेल्यानंतर मात्र दिव्यातून चालकांना प्रवास करावा लागत आहे. बारीक खडीचा थर, पावसाने पडलेले खड्डे, साचलेले पाणी यामुळे एक वेगळाच थरार अनुभवायला मिळत आहे. यामुळे हा पूल नवीन आहे की जुना असा प्रश्न चालकांना पडत आहे.