डोंबिवलीतील नेहरू मैदानाचे रुपडे पालटणार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

डोंबिवली - येथील नेहरू मैदानाची कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी (ता. १०) पाहणी केली. पाहणीदरम्यान, मैदानाच्या सुशोभीकरणासाठी खासदार निधीतून ५० लाख रुपयांचा निधी देण्यात येईल, अशी घोषणा शिंदे यांनी केल्यामुळे लवकरच या मैदानाचे रुपडे पालटण्याची आशा निर्माण झाली आहे.

डोंबिवली या सांस्कृतिक नगरीमधील मैदानांची अवस्था बिकट झाल्याची बातमी ‘सकाळ’ने ‘खेळाडू मैदानाच्या शोधात’ या मथळ्याखाली प्रसिद्ध केली होती. यात पूर्वेकडील नेहरू मैदानाची झालेली दुरवस्था सविस्तर मांडण्यात आली होती. याची दखल घेत शुक्रवारी डॉ. शिंदे यांनी नेहरू मैदानाची पाहणी केली. 

नेहरू मैदान हे डोंबिवलीतील जुने मैदान आहे; मात्र या ठिकाणी कचऱ्याचे ढीग, दगडांचा खच, पाईप, वाढलेली झाडे-झुडपे आणि इतर घाणींमुळे खेळाडूंना खेळणे कठीण झाले होते. आता मैदानाच्या साफ-सफाईसाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. या ठिकाणी वाढलेले गवत काढण्यात आले असून, पाईपही उचलण्यात आले आहेत. खासदार शिंदे यांनीही शुक्रवारी मैदानाची पाहणी केली. 

जॉगिंग ट्रॅक, ओपन जिम, खो-खोसाठी खांब, बॅडमिंटन खेळासाठी जाळी; तसेच स्वच्छतागृह आणि इतर सुशोभीकरण आणि सोईसाठी खासदार निधीतून ५० लाख रुपये देण्यात येतील, अशी घोषणा शिंदे यांनी या वेळी केली. पाहणीवेळी केडीएमसीचे महापौर राजेंद्र देवळेकर, स्थायी समिती सभापती  रमेश म्हात्रे, सभागृह नेते राजेश मोरे, नगरसेवक दीपेश म्हात्रे, माजी शहरप्रमुख भाऊ चौधरी आदी उपस्थित होते.

Web Title: dombivli news Nehru Stadium