
डोंबिवली : डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील पंडित दीनदयाळ रस्त्यावर असलेल्या धोकादायक इमारतीच्या पाडकामासाठी प्रशासनाने पुढील सात दिवसांसाठी वाहतूक बंदी लागू केली आहे. ही वाहतूक बंदी ११ ते १८ ऑगस्टपर्यंत लागू असून, दररोज सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा या वेळेत काम सुरू राहणार आहे. वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी यासंदर्भात अधिसूचना जारी केली असून, या कालावधीत कोपर पुलाजवळील हॉटेल रणजितपासून पंडित दीनदयाळ चौक (जुने द्वारका हॉटेल) पर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.