

Dombivli Water Supply cut
ESakal
डोंबिवली : शहराचा पाणीपुरवठा येत्या मंगळवारी (ता. ३०) सकाळी ९ ते रात्री ९ या कालावधीत एकूण १२ तास बंद राहणार आहे. खंबाळपाडा परिसरातील जलकुंभाच्या जलवाहिनीला लागलेली मोठी गळती थांबविण्यासाठी तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने कल्याण-डोंबिवली महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.