

Dombivli Water Scarcity
ESakal
डोंबिवली : ऐन फेब्रुवारी महिन्यातच डोंबिवली पश्चिमेला तीव्र पाणीटंचाईने ग्रासले आहे. प्रभाग क्रमांक २२ मधील सह्याद्रीनगर, राजूनगर, सरोवरनगर आणि महालक्ष्मी चौक परिसरात पाणीपुरवठा अत्यंत कमी दाबाने व अपुरा होत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत पालिकेने मोफत किंवा सवलतीच्या दरात वाढीव टँकर द्यावेत, अशी मागणी जोर धरत आहे.