मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसी विभागात वित्तीय संशोधन केंद्रासाठी 5 कोटीची देणगी

तेजस वाघमारे
Wednesday, 18 November 2020

मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसी विभागात स्थापन होणार केंद्र : युटीआयचे माजी अध्यक्ष डॉ. एस. ए. दवे यांनी दिली देणगी

मुंबई, ता. 18 : मुंबई विद्यापीठाच्या मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसी (आधीचे अर्थशास्त्र विभाग) विभागात वित्तीय बाबींशी निगडीत क्षेत्रात संशोधन केंद्र स्थापन होणार आहे. या केंद्रासाठी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी तथा युटीआयचे माजी अध्यक्ष डॉ. एस. ए. दवे यांनी रुपये 5 कोटीची देणगी दिली आहे. या संशोधन केंद्राअंतर्गत वित्तीय बाबींशी निगडीत विविध विषयांवर संशोधन केले जाणार आहे.

महत्त्वाची बातमी मुख्यमंत्री सहायता निधीस आर्थिक मदत देणाऱ्या राजकीय पक्षाची माहिती देण्यास नकार

मुंबई विद्यापीठातील एक स्वायत्त, नावाजलेले आणि सुप्रतिष्ठित विभाग म्हणून मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसी या विभागाची ख्याती आहे. विभागातील माजी विद्यार्थ्यानी देश-विदेशात त्यांच्या कर्तृत्वानी खूप मोठे लौकिक प्राप्त केले आहे. नुकतेच या विभागाने 1 ऑगस्ट रोजी आपला 100 वा वर्धापन दिन साजरा केला. वर्धापन दिनी आभासी पद्धतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात या संशोधन केंद्राच्या स्थापनेबाबत घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार विभागात नव्याने स्थापन करण्यात येत असलेल्या या संशोधन केंद्रात वित्तीय, औद्योगिक क्षेत्राशी निगडीत बाबींवर अध्यापन व संशोधन करून डेटा सायन्स, क्वांटीटेटीव्ह फायनान्स, बिझनेस ॲनालिटिक्स इत्यादी विषयांशी निगडीत क्षेत्रातील प्रमाणपत्र आणि पदविका अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत.

महत्त्वाची बातमी खेळता खेळता ४ वर्षीय अफिफाचा तोल गेला आणि अन्सारी कुटुंबावर ओढवला दुःखांचा डोंगर

या केंद्रासाठी युटीआयचे माजी अध्यक्ष डॉ. एस. ए. दवे यांनी नुकतेच मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांची भेट घेऊन 5 कोटीच्या देणगीचा धनादेश सुपुर्द केला. या देणगीतून स्थापन होत असलेल्या या केंद्राच्या माध्यमातून वित्तीय क्षेत्रात अध्यापन आणि  संशोधनाचे  देशातील एक अग्रगणी केंद्र म्हणून हे केंद्र विकसित होणार असल्याचे डॉ. एस. ए. दवे यांनी सांगितले.  यावेळी विभागाच्या संचालिका डॅा. माला लालवानी यांच्यासह विभागातील प्राध्यापक उपस्थित होते.

( संपादन - सुमित बागुल ) 

Donation of Rs 5 crore for Financial Research Center at Mumbai School of Economics and Public Policy


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Donation of Rs 5 crore for Financial Research Center at Mumbai School of Economics and Public Policy