खेळता खेळता ४ वर्षीय अफिफाचा तोल गेला आणि अन्सारी कुटुंबावर ओढवला दुःखांचा डोंगर

सुमित बागुल
Wednesday, 18 November 2020

मीरा भाईंदरमध्ये एक अत्यंत धक्कादाययक घटना घडलीये. मीरा भाईंदर महानगर पालिकेच्या शौचाल्याच्या टाकीत पडल्याने एका अवघ्या ४ वर्षीय लहान मुलीचा मृत्यू झालाय.

मुंबई : ऐन सणासुदीत मीरा भाईंदरमध्ये एक अत्यंत धक्कादाययक घटना घडलीये. मीरा भाईंदर महानगर पालिकेच्या शौचाल्याच्या टाकीत पडल्याने एका अवघ्या ४ वर्षीय लहान मुलीचा मृत्यू झालाय. अफिफा मुस्तफा अली अन्सारी असं या चार वर्षीय मुलीचे नाव आहे.

महत्त्वाची बातमी :  रुग्णांचा आकडा आटोक्यात, ठाण्यात सहा कोविड सेंटरसह क्वॉरन्टांईन सेंटरही बंद

सदर घटना मीरा भाईंदरच्या काशीमिरा उड्डाणपुलाच्या खाली घडली आहे. या भागात महानगरपालिका सुशोभीकरणाचे काम करत आहे. यावेळी कामादरम्यान शौचालयाच्या टाकीचे झाकण उघडे ठेवण्यात आलं होतं. दरम्यान खेळता खेळता अफिफा मुस्तफा अली अन्सारी ही चार वर्षीय चिमुकली शौचालयाच्या टाकीजवळ गेली आणि तिचा तोल जाऊन ती टाकीत पडली. या धक्कादायक अपघातात अफिफा मुस्तफा अली अन्सारीचा मृत्यू झालाय. 

सदर भीषण घटनेनंतर महानगर पालिका अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी अफिफा मुस्तफा अली अन्सारीच्या पालकांनी केली आहे. अपघातानंतर मीरा भाईंदरमधील काशिमीरा पोलिसांनी अफीफाचा मृतदेह ताब्यात घेऊन त्याला शवविच्छेदनसाठी पाठवण्यात आले आहे.आता या प्रकरणी पोलिसांकडून याप्रकरणाचा पुढील तपास करत आहे.

महत्त्वाची बातमी :   आदित्य ठाकरेंच्या भेटीसाठी सेना लोकप्रतिनिधींची रांग; आगळ्या वेगळ्या प्रकल्पांसाठी मागणी

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अफिफा आणि तिचं कुटुंब मुंबईतील मालाड भागात राहणारं. सणांच्या निमित्ताने हे कुटुंब मिरा भाईंदरमधील नातेवाईकांकडे आलं होतं. दरम्यान मिरा भाईंदरमध्ये सदर दुर्दैवी घटना घडली असून अन्सारी परिवारावर शोककळा पसरली आहे. 

four years old afifa fell into drainage tank and lost life at mira bhaindar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: four years old afifa fell into drainage tank and lost life at mira bhaindar