मृत्यूच्या मोबाईल नंबरचा पुन्हा धुमाकूळ

मृत्यूच्या मोबाईल नंबरचा पुन्हा धुमाकूळ

मुंबई - तुमच्या मोबाईलवर 777 888 999 या नंबरवरून कॉल आला तर घेऊ नका. कारण हा आहे मृत्यूचा नंबर. तो फोन तुम्ही रिसिव्ह केला, की स्फोट होतो. असे सांगणारा एक मेसेज आता पुन्हा व्हाट्सअॅपवरून व्हायरल झालाय. 

त्या व्हिडिओत आपल्याला पहिल्यांदा दिसतो एक आयफोन. त्याच्यावर 777888999 या नंबरवरून कॉल येतो. तो उचलताच स्फोट होतो. सगळ्या स्क्रीनवर आगीचे लोळ दिसतात आणि लगेच पुढच्या फ्रेममध्ये आपल्याला दिसतो हॉस्पिटलच्या बेडवर रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला एक तरूण. आणि मग एक चाळीसेक वर्षांची एक व्यक्ती आपल्याला सांगते, की या नंबरवरून आलेला कॉल आपल्या शरीराला इजा करू शकतो. प्रसंगी आपला जीव घेऊ शकतो. 

असे कशामुळे होते? तर तो माणूस सांगतो की या नऊ आकडी नंबरमध्ये एक व्हायरस आहे. त्याच्यामुळे तो रिसिव्ह करताच स्फोट होतो. 
हे सांगून झाल्यावर तो सर्वांना तळमळीची विनंती करतो, की आपल्या सगळ्या प्रिय व्यक्तींना माझा हा व्हिडिओ पाठवा. हे अपिल ऐकून लोकही तो व्हिडिओ फॉरवर्ड करतात. कारण त्याला पैसे पडत नाहीत. परंतु हा सगळाच व्हिडिओ एक फेकन्यूज आहे. 

गेल्या तीन-चार वर्षांपासून तो वारंवार व्हायरल होत असतो. त्यात काहीही तथ्य नसल्याचे जाणकार तज्ञांनी सांगितले आहे. मुळात भारतात असा नऊ आकडी नंबरच नाही. त्यामुळे त्यावरून कॉल येण्याची शक्यताच नाही. असे नंबर परदेशात असतात. त्यावरून भारतात कॉल आला तर त्या नंबरच्या आधी त्या देशाचा कोड नंबर नक्की येतो.

परंतु लोकांच्या मनातील फीअर फॅक्टरला हात घालून दहशत पसरवण्याचे धंदे करणारे समाजकंटक तो सतत फॉरवर्ड करीतच राहतात. तुमच्याही मोबाईलमध्ये असा व्हिडिओ आला असेल, तर तो फॉरवर्ड करू नका. हे खरं आहे का ते माहित नाही, परंतु काळजी म्हणून पुढे पाठवत आहे असे सुद्धा करू नका. तो व्हिडिओ डिलिट करून टाका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com