रियाचा पाठलाग करु नये; नाहीतर कारवाई अटळ, मुंबई पोलिसांच्या सूचना

पूजा विचारे
Wednesday, 7 October 2020

 जवळपास महिन्याभरानंतर रियाला जामीन मंजूर झाला. महिन्याभरानंतर रिया आता तुरुंगाबाहेर येणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी सूचना केल्या आहेत. 

मुंबईः अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात समोर आलेल्या ड्रग्स कनेक्शनमध्ये तुरुंगात असलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीलाजामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे.  जवळपास महिन्याभरानंतर रियाला जामीन मंजूर झाला. महिन्याभरानंतर रिया आता तुरुंगाबाहेर येणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी सूचना केल्या आहेत. 

रियाचा पाठलाग करु नये, अशा सूचना मुंबई पोलिसांनी दिल्या आहेत. नियम तोडून रियाचा पाठलाग केल्यास कारवाई करणार असल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे. येत्या ३ ते ४ तासांनंतर रियाची तुरुंगातून सुटका होईल. तुरुंग अधिकाऱ्यांना न्यायालयाच्या आदेशाच्या प्रतीची प्रतिक्षा आहे. त्यानंतर रियाची सुटका होईल. 

रियाला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा

पासपोर्ट पोलिसांकडे जमा करून सहा महिने विशिष्ट तारखांना पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याच्या अटीवर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. रियाने जवळच्या पोलिस ठाण्यात सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या कालावधीत नियमितपणे दहा दिवस हजेरी लावावी, असे आदेशही न्यायालयानं दिले. तसंच एक लाख रुपयांच्या रोख जामिनावर रियाचा जामीन मंजूर केला.

अधिक वाचाः  काल मुंबईत दाखल झालेले एकनाथ खडसे आज शरद पवारांना भेटणार?

न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर आज रियाच्या अर्जावर सुनावणी झाली.  याप्रकरणी अटकेत असणाऱ्या सॅम्युअल मिरांडा आणि दिपेश सावंत यांचा जामीन अर्ज देखील खंडपीठाने मंजूर केला आहे.  दीपेश सावंत याची ५० हजार रुपयांच्या जामिनावर सुटका करण्यात आली.  तर शौविकबरोबर अब्दुल बसित परिहारचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला.

हेही वाचाः  सायबर अटॅकमुळे आयडॉलच्या परीक्षेचा गोंधळ, पेपर पुढे ढकलले

रिया चक्रवर्तीला 8 सप्टेंबर रोजी जुन्या WhatsApp चॅटच्या आधारावर अटक करण्यात आली होती. याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या 5 पैकी 3 आरोपींना जामीन मंजूर झाला आहे.

Don't chase Rhea Otherwise action is inevitable Mumbai Police instructions


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Don't chase Rhea Otherwise action is inevitable Mumbai Police instructions