सावधान ! हँड सॅनिटायझर वापरून लगेच जेवण बनवाल तर होत्याचं नव्हतं होईल..

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

सॅनेटाईझर कितीही सुगंधी असेल तरी त्यांचा वापर कमी प्रमाणात करा

मुंबई :  संपूर्ण जगात कोरोनाची दहशत पसरलीये. चीन मागोमाग ईटली, अमेरीका, ईराण या देशांमध्ये कोरोनानं तांडव माजवला आहे. जगभरात कोरोनामुळे एकूण १५००० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र  कोरोनापासू बचाव करायचा असेल तर सतत हात स्वच्छ करत राहा, सोशल डिस्टंसिंग करा, असं वारंवार सांगण्यात येतंय. हात स्वच्छ करण्यासाठी सर्वात सोपा पर्याय हँड सॅनिटायझरचा आहे. मात्र हे हँड सॅनिटायझर स्वयंपाक घरात काम करणाऱ्या महिलांसाठी  घातक आहे. 

मोठी बातमी - ...ती चित्रफीत समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने एकच खळबळ!

भारतात कोरोनाचे ४०० च्या वर रुग्ण आहेत. एकट्या महाराष्ट्रात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णानाची संख्या ८९ वर गेलीये. त्यामुळे भारतातही कोरोनापासून बचाव करण्यासाठी हँड सॅनेटाईझर, मास्क आणि हँडवॉश यांची मागणी वाढत चालली आहे. अनेकदा घराबाहेर असताना त्यांना वारंवार हात धुणं शक्य होत नाही.  म्हणून स्वतःजवळ हॅन्ड सॅनेटाईझर ठेवा असा सल्ला अनेकजण देत आहेत. मात्र सानेटाईझरच्या वाढत्या उपयोगामुळे घरकाम करणाऱ्या महिलांच्या जीवाला धोका असण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी - कोरोनाच्या मुद्द्यावरून ट्विटरवर रंगला नरेंद्र मोदी विरुद्ध संजय राऊत सामना...

का आहे महिलांच्या जीवाला सॅनेटाईझरचा धोका:

हँड सॅनिटायझर हे द्रव्य किंवा जेलच्या स्वरूपात असतं. हे तुमच्या हातावर असलेल्या जंतूंना मारत असतं. यात अल्कोहोल हा घटक असतो. मुख्यत्वे अल्कोहोल यामुळेच  तुमच्या हातावरचे जंतू  नाहीसे होत असतात. कोरोनापासून बचाव करण्यासाठी महिला मुलं सगळेच हँड सॅनिटायझर मोठ्या प्रमाणावर वापरत वापरत्यात. मात्र अल्कोहोल हा ज्वलनशील पदार्थ आहे, अनेकदा महिला हे हँड सॅनिटायझर लावून किचनमध्ये जातात किंवा गॅस शेगडीजवळ जातात. ज्यामुळे त्यांच्या हातावर असलेलं सॅनिटायझर पेट घेण्याची शक्यता असते. यामुळे महिलांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.  

त्यामुळे हे सॅनेटाईझर कितीही सुगंधी असेल तरी त्यांचा वापर कमी प्रमाणात करा. घरी असताना सॅनिटायझर न वापरता हँडवॉशचा उपयोग करा. तसंच सॅनिटायझर लावून किचनमध्ये जाऊ नका.

dont go near flame or gas after using hand sanitizer read full story


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dont go near flame or gas after using hand sanitizer read full story