वादळाचा जोर ओसरेपर्यंत घराबाहेर पडू नका : उपमुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 3 June 2020

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यांसह किनारपट्टीवरील नागरिकांनी घरातच किंवा सुरक्षित ठिकाणी थांबावे. 'निसर्ग' वादळाचा जोर ओसरेपर्यंत बाहेर पडू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. 

मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेले 'निसर्ग' चक्रीवादळ बुधवारी दुपारपर्यंत महाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर विशेषत: अलिबाग, पालघर परिसरात धडकण्याची शक्‍यता लक्षात घेऊन मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यांसह किनारपट्टीवरील नागरिकांनी घरातच किंवा सुरक्षित ठिकाणी थांबावे. वादळाचा जोर ओसरेपर्यंत बाहेर पडू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. 

ही बातमी वाचली का? #CycloneNisarga :मुंबईत पावसाची रिपरीप वाऱ्याचा वेगही वाढला

चक्रीवादळापासून जिवितहानी, वित्तहानी होऊ नये म्हणून प्रशासनाने संपूर्ण दक्षता घेतली आहे. आवश्‍यकतेनुसार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. लाईफगार्ड, पोलिस, अग्निशमन दल, एनडीआरएफचे जवान सज्ज ठेवण्यात आले आहेत. आरोग्य यंत्रणा, स्थानिक प्रशासनही दक्ष आहे. 

ही बातमी वाचली का? VIDEO: अलिबागमध्ये 'निसर्ग' चक्रीवादळामुळे पावसाचा जोर वाढला

राज्याची संपूर्ण यंत्रणा तत्पर असून आवश्‍यकतेनुसार तात्काळ मदत उपलब्ध करण्याचे नियोजन झाले आहे. या वादळाचा वेग आणि ताकद मोठी असल्याने नागरिकांनी सावध, सुरक्षित रहावे, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही पवार यांनी केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Don't go out of the house till the storm subsides: Deputy cm ajit pawar