
मुंबई : आरोपी तहव्वूर राणाला तुरूंगात कोणतीही विशेष वागणूक देऊ नये. बिर्याणी किंवा वेगळी कोठडी देऊ नये आणि तातडीने त्याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात अनेकांना वाचविणाऱ्या एका चहा विक्रेत्याने केली. महंमद तौफिक ऊर्फ छोटू चायवाला असे त्यांचे नाव असून त्यांनी दहशतवाद्यांना शिक्षा देण्यासाठी कठोर कायदे करावेत, अशीही मागणी केली.