esakal | आता रांगा नका लावू, घरबसल्या मागवा डिझेलची होम डिलेव्हरी !
sakal

बोलून बातमी शोधा

आता रांगा नका लावू, घरबसल्या मागवा डिझेलची होम डिलेव्हरी !

आता रांगा नका लावू, घरबसल्या मागवा डिझेलची होम डिलेव्हरी !

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - तुम्हाला डिझेल पंपावर जाऊन लांब रांगेत उभं राहायचा कंटाळा येतो? आज नको उद्या जाऊ असं वाटतं? ऑफिसला जाताना डिझेल भरायला गेलात तर रांग लावून उशीर होऊन लेटमार्क लागतोय? एक मिनिट ही बातमी पूर्ण वाचा, कारण तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे.

केंद्र सरकारच्या एका निर्णयामुळे आता डिझेल तुमच्या घरीच डिलिव्हर होऊ शकतं. होय म्हणजेच डिझेलची होम डिलेव्हरी. भारतात आता काही स्टार्टअप्सना डिझेलची डिलेव्हरी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. केंद्राच्या या नव्या निर्णयामुळे इंधन विक्रीसाठी अनेक नवीन पर्याय उपलब्ध होतील असं बोललं जातंय. या नवीन पर्यायांच्या माध्यमातून ज्या स्टार्टअप्सकडे 'हायस्पीड मोबाइल डिस्पेंसर' व्यवस्था आहे अशाना आता डिझेलची होम डिलेव्हरी करता येणार आहे.

मोठी बातमीखरंच घोरपडीच्या तेलाने सेक्स पावर वाढते का? जाणून घ्या यामागचं व्हायरल सत्य...

अवैध इंधन वितरण रोखण्यासाठी देखील याची मदत होणार आहे. नव्या स्टार्टअपच्या माध्यमातून नवीन आणि सुरक्षित ग्रीड देखील तयार करण्यात येईल. यामाध्यमातून इंधन वितरणाची सुरक्षित व्यवस्था तयार करण्यात येईल. या धोरणाचा प्रमुख उद्देश भारतात नवीन बदल घडवणं, बेकायदेशीर इंधन वितरण थांबवणं आणि अधिकृत स्टार्टअप्सना इंधन वितरणासाठी प्रेरित करणे हा आहे. यामाध्यमातून यामुळे बेकायदेशीर इंधन वितरण नेटवर्क बंद होईल असं रेपॉस एनर्जीचे सह-संस्थापक चेतन वाळूंज यांनी सांगितलंय.  

धक्कादायक ! २०२० मध्ये कोरोना येईल, १९८१ मध्येच एका पुस्तकात लिहिली होती कथा...

देशभरात नवनवीन इंधन स्टेशन्स उभारले जातायत. अशा परिस्थितीत स्टार्टअप्ससाठी इंधन वितरण क्षेत्रात काम करण्यासाठी मोठी संधी आहे. यामुळे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड सारख्या तेल कंपन्यांकडून थेट इंधन घेऊन विक्री केली जाऊ शकते, असं देखील  चेतन वाळूंज म्हणालेत. 

dont stant in long ques for diesel filling get home delivery of diesel