
'सावित्रीजोती' ही सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील मालिका बंद करू नये अशी विनंती राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे.
मुंबई: सोनी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या 'सावित्रीजोती' ही सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील मालिका बंद करू नये अशी विनंती राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे. तसेच या मालिकेच्या निर्मितीसाठी चित्रपटाप्रमाणे अनुदान देण्याबाबत विचार करावा, अशी विनंती ही त्यांनी राज्याचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांना या विषयावर लिहिलेल्या पत्राद्वारे केली आहे.
टीआरपी न मिळाल्याने ही मालिका बंद करण्याचा निर्णय या वाहिनीने घेतला असल्याचे वृत्त अंत्यत वेदनादायी आहे.महाराष्ट्र म्हणजे फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र अशी ओळख आहे आणि तरीही महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित टिव्ही मालिका अपेक्षित दर्शक संख्या मिळत नसल्याने निर्मात्यांना बंद करावी लागतेय, हे वृत्त सर्वच पुरोगामी संवेदनशील लोकांसाठी आणि महाराष्ट्रासाठी चिंताजनक आहे. ही मालिका बंद झाल्यास महापुरुषांचा इतिहास आजच्या पिढीपर्यंत कसा पोहचणार? त्यामुळे जनतेनी ही मालिका आवर्जून पहावी, असे आवाहन त्यांनी केले.
हेही वाचा- कोविडच्या काळात 1200 कोटींचा खर्च, खर्चाचं ऑडीट होणार
तसेच ही मालिका चालू ठेवण्याची विनंतीही त्यांनी सोनी मराठी आणि मालिकेच्या निर्मात्याला विनंती केली आहे. चित्रपटाच्या धर्तीवर या मालिकेला अनुदान देण्याबाबत विचार करावा," अशी विनंती त्यांनी सांस्कृतिक मंत्री देशमुख यांना पाठविलेल्या पत्राद्वारे केली आहे.
मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
मंत्री नितीन राऊत यांनी आमच्याकडे विनंती केली आहे. आम्ही त्या दृष्टीने विचार करतोय. या प्रस्तावाची व्यवहार्यता तपासून त्यावर योग्य निर्णय घेतला जाईल.
अमित देशमुख , सांस्कृतिक कार्यमंत्री
-----------------------------
(संपादन- पूजा विचारे)
Don't stop Savitrijoti Daily soap Serial Nitin Raut Appeal amit deshmukh