esakal | 'मेट्रो रेल्वेचे श्रेय लाटू नये'
sakal

बोलून बातमी शोधा

'मेट्रो रेल्वेचे श्रेय लाटू नये'

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर घणाघात 

'मेट्रो रेल्वेचे श्रेय लाटू नये'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भिवंडी - ठाणे जिल्ह्यासह भिवंडी शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भाजप सरकारकडून विविध योजना राबविण्यात आल्या. त्यापैकीच एक असलेल्या भिवंडी मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर आहे. मात्र, सध्या मेट्रो रेल्वेचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र जनता सूज्ञ आहे. ते ज्याचे त्याचे माप त्याच्या पदरात टाकतील. आमच्या विकासाच्या रेषेपेक्षा मोठी रेषा मारा, आमची रेषा मिटवू नका. नाही तर जनता तुम्हाला मिटवेल, असा इशारा माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भिवंडीत झालेल्या कार्यक्रमात विरोधकांना दिला. 

हेही वाचा - अर्थसंकल्पात मुंबईसाठी 'या' नव्या तरतुदी

राज्यात आपले सरकार नसले, तरी देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींचेच राज्य आहे. त्यामुळे विकास कोणीही थांबवू शकत नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी खंबीर राहावे. जिल्ह्याचा विकास आम्ही केंद्राच्या माध्यमातून करू, असा विश्वासही फडणवीस यांनी या वेळी व्यक्त केला. भिवंडी तालुक्‍यातील अंजुर येथे आयोजित खासदार कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभीष्टचिंतन समारंभप्रसंगी ते बोलत होते. या वेळी आमदार किसन कथोरे, कुमार आयलानी, गणपत गायकवाड, शहराध्यक्ष संतोष शेट्टी, प्रशांत पाटील, जिल्हा परिषदेचे देवेश पाटील, सुमित पाटील, सिद्धेश पाटील, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सपना भोईर, जिल्हा सरचिटणीस राम माळी, माजी सरपंच सदस्य श्रीधर पाटील, राजन भोईर यांच्यासह ठाणे व पालघर जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. 
भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या विकासाचा ध्यास घेऊन खासदार पाटील अथक कार्यरत आहेत.

हेही वाचा -  सावधान! तुमच्या होळीच्या रंगात बसलाय कोरोना

भिवंडीत मेट्रो असो वा रस्ते, यामध्ये कपिल पाटील यांची मेहनत कोणीही नाकारू शकत नाही. त्याच्या कार्यातून तरुणांचा उत्साह पाहावयास मिळत आहे. कार्यतत्परता, नवी उमेद, नवा उत्साह आणि भव्यदिव्य आयोजन म्हणजे कपिल पाटील, असे नवे समीकरण आहे, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. 

सरकारकडून खोडा घालण्याचे काम 

महाविकास आघाडी सरकारकडून विविध कामांचे श्रेय घेताना ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोच्या श्रेयाचे बॅनर लावले आहेत. पण ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोचे श्रेय देवेंद्र फडणवीस यांचेच असून, ते कोणीही हिरावू शकत नाही. भिवंडी लोकसभा मतदारसंघात फडणवीस सरकारने योजनांच्या माध्यमातून कोट्यवधीं रुपयांचा पाऊस पाडला. पण हे स्थगिती सरकार त्यात खोडा घालण्याचे काम करीत आहे, अशी टीका कपिल पाटील यांनी विरोधकांवर केली. 

बक्षिसांची प्रशंसा 

खासदार चषक स्पर्धेतील भव्यदिव्य बक्षिसांची प्रशंसा करताना 26 बाईक एवढे बक्षीस राज्यात नव्हे; तर देशातही सर्वाधिक मोठे आहे. या स्पर्धेची माहिती झाली असती, तर देशातील रणजीपटूही स्पर्धेत उतरले असते. आताच्या स्पर्धेतूनही गुणवंत खेळाडू नक्की उदयाला येतील, असा विश्वास फडणवीस यांनी या वेळी व्यक्त केला.  

web title : Dont take credit for the Metro Rail