esakal | ईव्हीएम'मुळे लोकशाही धाेक्यात
sakal

बोलून बातमी शोधा

पाली : भारत मुक्ती मोर्चाचे मुख्य संयोजक वामन मेश्राम यांचे स्वागत करताना पदाधिकारी व कार्यकर्ते.

बहुजन वंचित आघाडीबाबत बोलताना वामन मेश्राम म्हणाले, कॉंग्रेस म्हणते ही भाजपची बी टीम आहे, परंतु ही भाजपची बी टीम नसून भाजपने ठेवलेली टीम आहे. ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, लोकशाहीचे रक्षण व्हावे हे आमचे ध्येय आहे. याकरिता आमचा सरकारवर जोरदार दबाव सुरू आहे. भविष्यात याबाबतचे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा वामन मेश्राम यांनी दिला. 

ईव्हीएम'मुळे लोकशाही धाेक्यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पाली : ईव्हीएममुळे मतदानाचा अधिकार संपला, मतदानाचा अधिकार संपल्याने लोकशाही संपली आणि लोकशाही संपल्याने संविधान धोक्‍यात आले, असे मत भारत मुक्ती मोर्चाचे मुख्य संयोजक वामन मेश्राम यांनी व्यक्त केले. 

बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांच्या नेतृत्वात ईव्हीएम मशीन विरोधात राष्ट्रव्यापी ईव्हीएम भांडाफोड परिवर्तन यात्रा काश्‍मीर ते कन्याकुमारीपर्यंत काढण्यात आली आहे. ही यात्रा गुरुवारी (ता.22) रायगडमध्ये दाखल झाली. त्यावेळी ते बोलत होते. 

बहुजन वंचित आघाडीबाबत बोलताना वामन मेश्राम म्हणाले, कॉंग्रेस म्हणते ही भाजपची बी टीम आहे, परंतु ही भाजपची बी टीम नसून भाजपने ठेवलेली टीम आहे. ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, लोकशाहीचे रक्षण व्हावे हे आमचे ध्येय आहे. याकरिता आमचा सरकारवर जोरदार दबाव सुरू आहे. भविष्यात याबाबतचे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा वामन मेश्राम यांनी दिला. 
या वेळी सत्यशोधक वारकरी महासंघाचे रायगड जिल्हाध्यक्ष ह.भ.प महेश पोंगडे महाराज, विनोद इंगळे, प्रभाकर गायकवाड, वंदीप जाधव, सुरेश आंग्रे, सुनील दळवी, भीम महाडिक, बशीरभाई परबळकर, महंमदभाई धनसे आदींसह भारत मुक्ती मोर्चाचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. 

राज ठाकरेंना मोदी घाबरतात 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सक्त वसुली संचलनालयाने (ईडी) चौकशी केली आहे. कारण त्यांनी ईव्हीएमविरोधात रान उठवले. याचा अर्थ राज ठाकरेंना मोदीही घाबरत आहेत, हे यावरून सिद्ध झाले आहे. राज ठाकरेंचे ईव्हीएमविरोधी आंदोलन योग्य असून आम्ही त्यांचे समर्थन करतो, असे वामन मेश्राम म्हणाले. 
 
loading image
go to top