आयुध निर्माणी संस्थांचे खासगीकरण नको - पटोले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

देशभरातील आयुध निर्माण संस्थांमधील कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने हे प्रस्तावित खासगीकरण मागे घ्यावे अशी आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मागणी आहे. मात्र सरकार दडपशाही करून त्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत आहे, असा आरोप पटोले यांनी केला.

मुंबई - खासगीकरणाचा सपाटा लावलेल्या भाजप सरकारने आता राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधीत आयुध निर्माणी संस्थांच्याही खासगीकरणाचा डाव रचला आहे.

या संस्थांमधील कर्मचाऱ्यांचा त्यास विरोध आहे. मात्र हुकूमशाही पद्धतीने कारभार करत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खासगी कंपन्यांच्या फायद्यासाठी देशाची सुरक्षाच धोक्‍यात आणत आहेत, असा थेट आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रचार प्रमुख नाना पटोले यांनी केला.

देशभरातील आयुध निर्माण संस्थांमधील कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने हे प्रस्तावित खासगीकरण मागे घ्यावे अशी आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मागणी आहे. मात्र सरकार दडपशाही करून त्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत आहे, असा आरोप पटोले यांनी केला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dont want privatization Ordnance Factory Nana Patole