मोठी बातमी! अजित पवारांनी 'सीएए-एनआरसी'वर सोडले मौन!

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 1 March 2020

सीएए, एनआरसी व एनपीआर या केंद्र सरकारच्या कायद्यावरून लोक जाणीवपूर्वक चर्चा घडवण्याचे प्रयत्न करत आहेत. पण अशा चर्चांना बळी पडू नका. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून सर्व जनतेच्या हितासाठी बांधील आहे. असे स्पष्ट प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राष्ट्रवादी च्या कार्यकर्ता शिबीरात केले.

मुंबई -  सीएए, एनआरसी व एनपीआर या केंद्र सरकारच्या कायद्यावरून लोक जाणीवपूर्वक चर्चा घडवण्याचे प्रयत्न करत आहेत. पण अशा चर्चांना बळी पडू नका. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून सर्व जनतेच्या हितासाठी बांधील आहे. असे स्पष्ट प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राष्ट्रवादी च्या कार्यकर्ता शिबीरात केले.

#BMCपालिकेचा धडाका : आठ दिवसांत ३५० कोटींची वसुली

 राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी समाजातील सर्व घटकांना शरद पवार यांची या कायद्यासंदर्भातील भूमिका सामान्य नागरीकांपर्यंत पोहचवावी. ही भूमिका समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देणारी आहे. त्यामुळे  सीएए, एनआरसी व एनपीआरला कोणी घाबरून जाऊ नका. बिहारला असे झाले , तमक्याने तसे केले. या भ्रमात न राहता असे गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करणार्यांना शरद पवार यांनी शब्द दिल्याचे सांगा. या निर्णयाचा महाराष्ट्रतील एकाही नागरिकाला त्रास होणार नाही. सरकारमध्ये राष्ट्रवादी आहे त्यामुळे राष्ट्रवादी काळजी घेईल. असे स्पष्ट आदेशच अजित पवार  यांनी दिले. महाविकास आघाडी कार्यकर्त्यांना आपापसात संघर्ष न करता आपला पक्ष मोठं करण्यासाठी काम करा. वॉर्डात काम करताना कृपा करून गैरसमज होऊ देऊ नका महाविकास अघडीचा उमेदवार निवडून आले पाहिजे, अशा सूचनाही अजित पवार यांनी यावेळी केल्या. 

Don't worry about CAA, NPR- ajit pawar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Don't worry about CAA, NPR- ajit pawar