
धारावीत आज 8 नवीन रुग्ण सापडल्याने रुग्णांची संख्या 2309 वर पोहोचली आहे. आज एकही रुग्ण दगावला नसून मृतांचा आकडा 81 इतकाच आहे.
मुंबई : मुंबईत कोरोनाची साथ सुरु झाली तेव्हा सर्वांना चिंता होती ती धारावीची. सुरुवातीला वरळी कोरोनाचा हॉटस्पॉट झाल्यानंतर प्रशासनाने धारावीवर विशेष लक्ष दिले. तरीही बघता बघता धारावीत कोरोनाची साथ आलीच. अवघ्या काही दिवसांत धारावीत मोठ्या संख्येने रुग्ण आढळू लागले. महापालिका आयुक्त इक्वालसिंह चहल यांनी धारावीवर विशेष लक्ष केंद्रीत करत उपाययोजनांवर भर दिला.
...म्हणून केरळहून आलेलं वैद्यकीय पथक माघारी परतलंय; जाणून घ्या काय झालं तर...
घरोघरी तपासणी, चाचण्यांची वाढवलेली संख्या, हायरिस्कमधील लोकांचे विलगीकरण आदी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे धारावीत रुग्ण दुपटीचा कालावधी वाढला असून तो आता 140 दिवसांवर गेला आहे. तर रुग्ण वाढीचा दर हा सातव्या दिवशी सरासरी 0.55 टक्के इतका असून केवळ 7 रुग्ण दाखल होत आहेत. आज धारावीत पुन्हा एकदा एकेरी रुग्णसंख्या म्हणजे 8 रुग्ण सापडले आहेत. जी उत्तर मध्ये एकूण 1325 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मंत्री महोदय म्हणतात, 'कोरोनिल'ने कोरोना बरा होत नाही; खबरदार संभ्रम निर्माण केला तर...
धारावीत आज 8 नवीन रुग्ण सापडल्याने रुग्णांची संख्या 2309 वर पोहोचली आहे. आज एकही रुग्ण दगावला नसून मृतांचा आकडा 81 इतकाच आहे. तर दादर मध्ये आज 27 नवीन रुग्ण सापडले असून रुग्णांची एकूण संख्या ही 914 इतकी झाली आहे. तर आजपर्यंत 16 मृत्यू झाले आहेत. माहीम मध्ये आज 34 नवीन रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची संख्या 1190 इतकी झाली आहे. तर मृतांचा आकडा 14 इतका आहे.
कोरोनावरील सर्वात प्रभावी अशा 'टॉसिलीझुमॅब'चा तुटवडा, परिणाम होंतोय नवी मुंबई ठाण्यातील रुग्णांवर
धारावीसह दादर आणि माहीम मधील परिस्थिती देखील नियंत्रणात असल्याचे दिसते. या तीनही परिसरात मिळून आज दिवसभरात 69 नवीन रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णांची संख्या 4413 इतकी झाली आहे. तर मृतांचा आकडा 111 इतका आहे. धारावी, दादर, माहीम परिसरात बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत देखील दिलासादायक वाढ झाली आहे. आतापर्यंत दादर मध्ये एकूण 500, माहीम मध्ये एकूण 782 तर धारावीत 1672 असे एकूण 2954 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत