उत्तम बातमी - मुंबईतील कोरोना गुणाकाराचा दर देशातील सरासरी दरापेक्षा जास्त,

उत्तम बातमी - मुंबईतील कोरोना गुणाकाराचा दर देशातील सरासरी दरापेक्षा जास्त,
Updated on

मुंबई - मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा वाढतोय. गेल्या काही दिवसात सातत्याने मुंबईतील कोरोना रुग्णांचा वाढत आकडा आपल्या समोर येतोय. अशात मुंबईतून एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर येतेय. मुंबई महानगरपालिकेकडून एक दिलासादायक माहिती देण्यात आलीये . यामध्ये मुंबईतील कोरोना रुग्ण दुपटी होण्याचा दर दहा दिवसांवर गेल्याचं नमूद केलंय. एका संदेशातुन माध्यमांना याबाबत माहिती दिली गेली आहे. 

Dear All,
This is the first good news :
Our doubling rate is 10 days which is better than National average of 9.5
Our Mortality rate which 3.7 is better than State average and near the national average 
Thanks to all your efforts containment efforts , aggressive contact tracing and isolation is working;
I want to request all ward officers, MOH and through you to all your staff to keep up the efforts :
We have to win battle against COVID :
The entire universe is conspiring to enable our Mumbai to fight this menace !

मुंबईत कोरोना गुणाकाराच्या दर हा दहा दिवसांवर गेलाय. देशभरात कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा दर हा ९.५ दिवसांचा आहे. अशात मुंबईत कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा दर दहा दिवसांवर गेलाय. केवळ रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा दर नाही तर मुंबईतील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर हा देखील आता ३.७% आहे. देशातील अनेक राज्यांच्या सरासरी कोरोना मृत्युदराच्या तुलनेत मुंबईतील कोरोना मूत्यूदर कमी असल्याचं महापालिकेने सांगितलंय. 

मुंबईत धारावीत मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या आहे. देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण हे मुंबईत आहेत. अशात मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने मुंबईतून लवकरात लवकर कोरोनाचा प्रभाव कमी व्हावा अशीच सर्वांची इच्छा आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेकडून आलेला हा संदेश सुखावणारा आहे. 

doubling rate in Mumbai is 10 days which is better than National average says BMC

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com