कोरोनामुळे जग कोमात, मात्र ज्योतिषांचा धंदा जोमात; जोतिषांना लोकं विचारतायत....

कोरोनामुळे जग कोमात, मात्र ज्योतिषांचा धंदा जोमात; जोतिषांना लोकं विचारतायत....

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्ण जगात पसरला आहे. जगभरात ३० लाखांहून अधिक लोकं या महामारीच्या कचाट्यात सापडले आहेत. भारतातही हा आकडा वाढतंच चालला आहे. अचानक आलेला हा व्हायरस जगातून संपूर्णपणे कधी निघून जाईल? यावरची लस कधी तयार होईल? असे आणि यासारखे अनेक प्रश्न लोकांना पडत आहेत. या त्यांच्या प्रश्नाची उत्तरं शोधायला त्यांनी भविष्यकर्त्यांची किंवा ज्योतिषांची मदत घ्यायला सुरुवात केली आहे.

कोरोनामुळे जग किती प्रभावित झालं आहे हे बघून लोकांना आपल्या नोकरीची, आपल्या करिअरची किंवा भविष्याची चिंता वाटत आहे. तसंच हा रोग संपूर्णपणे कधी निघून जाईल? किंवा यावर लस कधी तयार होईल? असडेही प्रश्न लोकांना पडत आहेत. मात्र यासाठी लोकं ज्योतिषांची मदत घेत आहेत. ज्योतिषांकडे अशाप्रकारचे प्रश्न विचारणारे अनेक फोन येत आहेत. भारतातील सुप्रसिद्ध ज्योतिषशास्त्राची वेबसाईट GXXXXXXXXs.com असे शेकडो प्रश्न रोज विचारले जात आहेत.  

" आतापर्यंत लोकं आधी रिलेशन, लग्न, जॉब याबद्दल विचारणा करत होते आणि त्यानंतर आरोग्य संबंधी विचारणा करत होते. मात्र आता कोरोनामुळे स्थिती बदलली आहे. आता लोकं कोरोनासंबंधी प्रश्न, त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्य संबंधीचे प्रश्न किंवा जॉब संबंधीचे प्रश्न विचारत आहेत. परदेशात राहणारे लोकं इथे राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबाबद्दल प्रश्न विचारत आहेत," असं या वेबसाईटचे पदाधिकारी धर्मेश जोशी यांनी सांगितलंय.

इतर काही ज्योतिषशास्त्राशी निगडित वेबसाईटवर अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत. यामुळे या वेबसाईट्सवर येणाऱ्या प्रश्नांमध्ये अचानक ३०-३५ टक्क्यांची वाढ झाली आहे. लोकं आपल्या भविष्याची चिंता करत अशाप्रकारचे प्रश्न विचारत आहेत.

ज्या ज्योतिषांची कुठलीही वेबसाईट नाही अशा ज्योतिषांकडेही दिवसभरात शेकडो फोन येत आहेत. "लोकं सध्या त्यांची नोकरी कशी टिकून राहील? पगार कमी होणार नाही ना ? असे प्रश्न मला करत आहेत," असं कानपूरचे प्रसिद्ध ज्योतिष्य हिमांशू अवस्थी यांनी म्हंटलंय.

एकूणच काय तर लोकांना वर्तमानात भविष्याची कोणतीही चाहूल लागत नाहीये त्यामुळे लोकं भविष्यकर्त्यांची किंवा ज्योतिषांची मदत घेत आहेत. मात्र कोरोनाच्या या गंभीर समस्येचं उत्तर ज्योतिषांकडेसुद्धा आहे की नाही हा मोठा प्रश्न आहे.

people are calling pundits and jyotish to ask questions about future and lockdown

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com