वॉटस्‌ऍपवरील डीपी तरुणीला ठरला महाग 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

विक्रोळी - सोशल मीडियावर आपण अनेकदा आपलेच छायाचित्र व्हायरल करतो. वॉटस्‌ऍपचा डीपी म्हणूनही आपण अनेकदा आपले छायाचित्र ठेवतो; पण ते कधी कधी धोक्‍याचे ठरू शकते. असाच काहीसा धक्कादायक अनुभव मुलुंडमध्ये राहणाऱ्या एका तरुणीला आला. तिने वॉटस्‌ऍपवर ठेवलेले तिचे छायाचित्र एका अश्‍लील पेजवर तिच्या मोबाईल क्रमांकासह टाकण्यात आल्याने तिला अनेकांचे अश्‍लील फोन येऊ लागले. परिणामी ती सध्या मानसिक तणावाखाली आहे. 

मुलुंडमध्ये राहणाऱ्या राधिकाला (नाव बदलले आहे) व्हॉटस्‌ऍपवर छायाचित्र अपलोड करणे महागात पडले. राधिकाने दोन महिन्यांपूर्वी स्वतःचे छायाचित्र व्हॉटस्‌ऍपवर डीपी म्हणून ठेवले होते. ते सेव्ह करून कोणी तरी एका अश्‍लील पेजवर तिच्या मोबाईल क्रमांकासह अपलोड केले. वेगळ्या नावाने तिचे फेसबुक अकाऊंटही उघडण्यात आले. त्यामुळे दोन महिन्यांपासून मोबाईलवर अश्‍लील संदेश आणि जगभरातून फोन कॉल्स येत असल्याने राधिकासह तिचे कुटुंबीय मानसिक दबावाखाली आहे. 

दोन महिन्यांत राधिकाने अनेक अनोळखी फोन नंबर ब्लॉक केले. झाल्या प्रकाराची तक्रार मुलुंड पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे; परंतु दोन महिन्यांनंतरही पोलिस आरोपीपर्यंत पोहचू शकलेले नाहीत. उलट खासगी सायबर कन्सल्टंटची मदत घेण्याचा सल्ला दिल्याचा आरोप राधिकाने केला आहे. लवकरच आरोपी पकडला जाईल असे मुलुंड पोलिस सांगत असले, तरी दोन महिन्यांत त्यांच्या हाती काही लागलेले नाही. राधिकाला आजही फोन कॉल्स आणि अश्‍लील संदेश येत आहेत. 

मुलुंड पोलिसांनी आयटीअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. आम्ही खासगी सायबर कन्सल्टंट नेमण्याचा सल्ला दिलेला नाही. 
- लता सुतार (तपास अधिकारी) 

Web Title: DP on the Whatsapp