डॉ. आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाला सुरवात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 एप्रिल 2017

मुंबई  - अनुसूचित जाती, वंचित व दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी असलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती सामान्य जनतेला व्हावी, यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. राज्यात 8 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत हा सप्ताह साजरा करण्यात येत असून, त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी आज दिली.

उद्या (ता. 9) सामाजिक न्याय विभागांतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची, तसेच कर्जवाटपासंबंधीची यावर सविस्तर माहिती देण्यात येईल.

कृषी स्वावलंबन योजना, रमाई आवस योजना, स्वाधार योजना, स्टॅंड अप इंडिया, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामूहिक, औद्योगिक प्रोत्साहन योजना, परदेश शिष्यवृत्ती योजना अशा योजनांची संपूर्ण माहिती दिली जाणार आहे, असे बडोले यांनी सांगितले. सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी (ता. 14) जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Web Title: dr. ambedkar social equality week start