उल्हासनगर : उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा (Dr. Babasaheb Ambedkar Statue) उभारण्यात आल्याचा प्रकार समोर आल्याने आंबेडकरी अनुयायांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. स्मशानभूमीतील पुतळ्याला स्थळ अयोग्य असल्याचा आरोप करत रिपब्लिकन पक्षाचे (रिपाई) नेते श्याम गायकवाड यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.