स्मारक 2020 मध्ये पूर्णत्वाला - बडोले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

मुंबई - इंदू मिल येथील साडेबार एकर जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या भव्य स्मारकाचे काम प्रगतीपथावर असून 14 एप्रिल 2020 रोजी स्मारकाचे काम पूर्ण होईल, असा ठाम विश्वास सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आज येथे व्यक्त केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या बांधकामाचा आढावा बैठकीस तसेच कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी बडोले यांनी इंदू मिलच्या जागेवर आज भेट दिली. कामांची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. त्यानंतर ते प्रसार माध्यमांसोबत बोलत होते.

Web Title: dr. babasaheb ambedkar monument rajkumar badole