साखरे महाराज यांना ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जुलै 2018

मुंबई -  राज्य शासनाच्या वतीने संत साहित्यासाठी, तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा २०१७-१८ चा ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार हा डॉ. किसन महाराज साखरे यांना आज येथे घोषित करण्यात आला.

मुंबई -  राज्य शासनाच्या वतीने संत साहित्यासाठी, तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा २०१७-१८ चा ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार हा डॉ. किसन महाराज साखरे यांना आज येथे घोषित करण्यात आला.

संत साहित्यावर लेखन किंवा संतांना अभिप्रेत मानवतावादी कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तीला राज्य शासनाच्या वतीने प्रतिवर्षी ज्ञानोबा-तुकाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. ५ लाख रुपये रोख,  मानपत्र, तसेच मानचिन्ह, असे पुरस्कारांचे स्वरूप असून, आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर सांस्कृतिक कार्यमंत्री  विनोद तावडे यांनी आज पुरस्काराची घोषणा केली. डॉ. किसन महाराज साखरे हे संत वाङ्‌मयावर अध्यापन करीत असून, गेली ५७ वर्षांपासून अनेक मासिकांमधून, तसेच वृत्तपत्रांमधून उपनिषदांपासून ते संत वाङ्‌मयावर लेखन करीत आहेत.

Web Title: Dr. Kisan Maharaj sakhare Declared Awards