Loksabha Election 2024 : उल्हासनगरात उबाठा गटाला धक्का ; युवासेना अधिकारी ॲड.आकाश सोनवणे शिवसेनेत

खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी शनिवारी उल्हासनगर विधानसभा मतदार संघात गाठीभेटीचा दौरा केला आहे.
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024 sakal

उल्हासनगर : खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी शनिवारी उल्हासनगर विधानसभा मतदार संघात गाठीभेटीचा दौरा केला आहे.याच दौऱ्या दरम्यान शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पश्चिम मधील युवासेना अधिकारी ॲड.आकाश सोनवणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उबाठाला धक्का बसला आहे.

डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या गोलमैदान मधील जनसंपर्क कार्यालयात खासदार डॉ.शिंदे,कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे,महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या हस्ते ॲड.आकाश सोनवणे यांनी अनेक तरुणांसोबत उबाठा मधून शिवसेनेत प्रवेश केला आहे.यावेळी युवासेना कल्याण जिल्हा सचिव विक्की भुल्लर, युवासेना अधिकारी बाळा श्रीखंडे आदी उपस्थित होते.

Loksabha Election 2024
Loksabha Election 2024 : अजितदादा म्हणजे आमचे दैवत; त्यांनी दिलेला आदेश पूर्ण होणारच-आशिष दामले!

महाराष्ट्रात शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-रिपाइं आठवले गट हे महायुतीत आहेत.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनीही महायुतीला बिनशर्त पाठींबा दिलेला आहे.यांच्या सोबत साईपक्ष आणि टीम ओमी कालानी हे देखील डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारात उतरणार असल्याने उल्हासनगर विधानसभा मतदार संघात डॉ.शिंदे यांच्यासाठी पोषक वातावरण निर्मिती होऊ लागली आहे.

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कल्याण लोकसभा मतदार संघातील उमेदवार वैशाली दरेकर ह्या येत्या काही दिवसात उल्हासनगर विधानसभा मतदार संघात कशी पकड निर्माण याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com