नालेसफाईची कामे रखडली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 एप्रिल 2017

खार रोड - वांद्रे ते विलेपार्ले पश्‍चिम द्रुतगती महामार्गावरील सर्व्हिस रोडच्या दुतर्फा असलेल्या भूमिगत नाल्यांची पावसाळी कामे सध्या रखडली आहेत. पावसाळ्यापूर्वी वेळेत नालेसफाई झाली नाही, तर सर्व्हिस रोडला लागून असलेल्या परिसरातील नागरिकांच्या घरांत पावसाचे पाणी शिरण्याचा धोका आहे. भुयारी मार्गात साचणाऱ्या दूषित पाण्यातून त्यांना चालावे लागणार आहे.

अलियावर जंग पश्‍चिम द्रुतगती महामार्गावरील सर्व्हिस रोडच्या दुतर्फा असलेले मोठे नाले व भूमिगत गटारांची अद्याप साफसफाई सुरू झालेली नाही. भूमिगत नाले व गटारे गाळाने भरलेली आहेत. सुशोभीकरणासाठी लावण्यात आलेली झाडे पाण्याअभावी सुकत आहेत. सर्व्हिस रोडवर जागोजागी बेकायदा पार्किंग, कचरा आणि डेब्रिजचे ढीग साचलेले आहेत. खेरवाडी व कार्डिनल भुयारी मार्गात गळती होत असून दूषित पाणी साचत आहे. परिसरातून वाहत येणारे मोठे नाले व पर्जन्य जलवाहिन्यांतील गाळ काढण्यास सुरुवात झालेली नाही. सर्व्हिस रोडवरील नाल्यांची सफाई व भुयारी मार्गांची दुरुस्ती सार्वजनिक बाधकाम विभागाच्या सांताक्रूझ उप विभाग क्र. १० च्या कार्यालयातून करण्यात येत असते.

लवकरच कामे सुरू होतील
कार्यालय शाखा अभियंत्यांना त्याबाबत विचारले असता ते म्हणाले, की पश्‍चिम द्रुतगती मार्गाचा विकास मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या कामासाठी आखणी सुरू आहे. लवकरच प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माहितीनुसार पावसाळ्यापूर्वीची कामे सुरू करण्यात येतील.

Web Title: Drain cleaning works